December 18, 2024 10:53 AM December 18, 2024 10:53 AM

views 9

दक्षिण कोरियाचे लष्करप्रमुख पार्क एन सू यांना अटक

दक्षिण कोरियाचे लष्करप्रमुख पार्क एन सू यांना काल अटक करण्यात आली. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष योन सूक येओल यांच्या अल्पकालीन लष्करी राजवटीत पार्क यांनी त्यांचे मुख्य कमांडर म्हणून काम पाहिले होते. त्यांच्यावर बंडखोरी तसंच सत्तेचा गैरवापर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याच्या आरोपाखाली न्यायालयानं त्यांना अटक करण्याचा आदेश दिला. लष्करी कायदा लागू करण्याच्या असफल प्रयत्न केल्याप्रकरणी दक्षिण कोरियात आत्तापर्यंत पार्क यांच्यासहीत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

October 1, 2024 2:20 PM October 1, 2024 2:20 PM

views 18

चीनसोबत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरली परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत भारत कोणत्याही आव्हानाला सामोरं जायला तयार असल्याचं लष्करप्रमुखांचं प्रतिपादन

चीनसोबत एलएसी अर्थात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरली परिस्थिती स्थिर असली तरी सामान्य झालेली नाही असं लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत चाणक्य डिफेन्स डायलॉग या कार्यक्रमात ते आज बोलत होते. एप्रिल २०२० पूर्वी होती तशी स्थिती पूर्ववत करणं हे भारताचं उद्दिष्ट असल्याचं द्विवेदी यांनी सांगितलं. ही परिस्थिती जोपर्यंत पूर्ववत होत नाही तोपर्यंत भारत कोणत्याही स्थितीला तोंड द्यायला तयार आहे, असंही लष्करप्रमुख द्विवेदी यांनी सांगितलं.