January 11, 2026 3:35 PM

views 9

तिन्ही सैन्यदलांच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या विशेष संचलनाचं मरीन ड्राईव्ह इथं आयोजन

येत्या १४ जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या ट्राय सर्व्हिस व्हेटरन्स डे निमित्त तिन्ही सैन्यदलांच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या विशेष संचलनाचं आयोजन आज मुंबईत मरीन ड्राईव्ह इथे करण्यात आलं होतं. या संचलनात तिन्ही सैन्य दलांचे निवृत्त अधिकारी, नौदलाचे कॅडेट्स, एनसीसी कॅडेट्स यांनीही सहभाग घेतला होता. भारतीय सैन्य दलाचे पहिले फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांच्या निवृत्तीच्या स्मरणार्थ दरवर्षी १४ जानेवारी रोजी ट्राय सर्व्हिस व्हेटरन्स डे साजरा करण्यात येतो. 

November 30, 2025 10:50 AM

views 44

बदलत्या तंत्रज्ञानानुसार आत्मनिर्भर होण्यासाठी सैन्य दलात दाखल होणाऱ्या छात्रांनी सक्षम राहावं – डॉ. अजय कुमार

बदलत्या तंत्रज्ञानानुसार आत्मनिर्भर होण्यासाठी सैन्य दलात दाखल होणाऱ्या छात्रांनी सक्षम राहावं असं आवाहन केंद्रीय लोकसेवा आयोगाचे प्रमुख डॉक्टर अजय कुमार यांनी काल पुण्यात केलं.  राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४९ व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.  आगामी शतकातील युद्धांमध्ये शहाणपणा, सहानुभूती आणि बुद्धिमत्तेनं जो नेतृत्व करेल त्याचाच विजय होईल  असंही त्यांनी अधोरेखित केलं. या तुकडीचं दीक्षांत संचलन आज सकाळी एनडीए च्या मैदानावर  सुरू असून नौदल प्रमुख ऍडमिरल दिन...

August 27, 2025 5:20 PM

views 17

कोणत्याही प्रकारच्या संघर्षासाठी लष्कराला सतत सज्ज रहावं लागतं – संरक्षण मंत्री

छोट्या चकमकींपासून ते वर्षांनुवर्षांच्या युद्धापर्यंत कोणत्याही प्रकारच्या संघर्षासाठी लष्कराला सतत सज्ज रहावं लागतं, असं प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केलं. ते मध्यप्रदेशात आर्मी वॉर कॉलेजमध्ये सुरु असलेल्या रण-संवाद उपक्रमात संबोधित करत होते.   सध्याच्या अनिश्चित भूराजकीय परिस्थितीमुळे युद्धाला तोंड फुटणं किंवा ते थांबणं यांपैकी कशाचंही भाकित करता येत नाही असं ते म्हणाले.

April 7, 2025 9:00 PM

views 26

देशाच्या तिन्ही सशस्त्र दलांच्या चमूच्या मुंबई ते सेशेल्स समुद्रप्रवासाला प्रारंभ

देशाच्या तिन्ही सशस्त्र दलांच्या १२ महिला अधिकाऱ्यांच्या चमूच्या मुंबई ते सेशेल्स समुद्रप्रवासाला आज प्रारंभ झाला. पुण्याच्या लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कमांडंट लेफ्टनंट जनरल ए. के. रमेश यांनी IASV त्रिवेणी या नौकेवरच्या या चमूला झेंडा दाखवून सेशेल्सच्या दिशेनं रवाना केलं. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या एकंदरीत १२ महिला अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे अशी मोहीम पहिल्यांदाच हाती घेतली आहे. या वर्षी जगप्रदक्षिणेला निघण्यापूर्वीची ही सराव मोहीम आहे. मोहिमेचं नेतृत्व कॅप्टन डॉली बुटोला यांच्याक...

April 7, 2025 4:01 PM

views 25

तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांचा मुंबई ते सेशेल्स असा समुद्रप्रवास

देशाच्या तिन्ही सशस्त्र दलांच्या महिला अधिकाऱ्यांच्या मुंबई ते सेशेल्स समुद्रप्रवासाला आज प्रारंभ झाला. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या एकंदरीत १२ महिला अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे अशी मोहीम पहिल्यांदाच हाती घेतली आहे. या वर्षी जगप्रदक्षिणेला निघण्यापूर्वीची ही सराव मोहीम असेल. 

January 15, 2025 3:14 PM

views 23

७७व्या लष्कर दिनानिमित्त देशाचं सेनादलाला अभिवादन

सशस्त्र दलाच्या अतुलनीय बलिदानाचा सन्मान करण्यासाठी आज लष्कर दिन साजरा केला जात आहे. भारतीय लष्कराचं सैनिकांचं शौर्य, बांधिलकी आणि मातृभूमीची सेवा यांचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. याच दिवशी १९४९मध्ये तत्कालीन जनरल के. एम. करिअप्पा यांनी शेवटच्या ब्रिटीश कमांडर इन चीफकडून भारतीय सैन्याची सूत्रं हातात घेतली होती. या घटनेच्या स्मरणार्थ लष्कर दिन साजरा केला जातो.   लष्कर दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लष्करातले जवान आणि ज्येष्ठ तसंच निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत...

January 12, 2025 11:16 AM

views 19

पुण्यातील लष्कर दिन सोहोळ्यात नेपाळ लष्कराच्या वाद्यवृंदाचा प्रथमच सहभाग

77 व्या लष्कर दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आयोजित दक्षिण विभागाच्या सन्मान सोहोळ्यात, लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या हस्ते विविध पदकं देऊन, लष्करी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसंच या दिनाच्या संचलनाची रंगीत तालीम काल घेण्यात आली. पंधरा जानेवारीला होणाऱ्या लष्कर दिन सोहोळ्यात नेपाळ लष्कराचा वाद्यवृंद प्रथमच सहभागी होणार आहे.    लष्कर दिन सोहळ्यात 7 वाद्यवृंद सहभागी होणार असून नेपाळ लष्कर वाद्यवृंद चाही यामध्ये समावेश आहे. भारतीय लष्कर दिन ...