July 26, 2024 8:18 PM July 26, 2024 8:18 PM

views 12

लोकसभेत मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत दिली माहिती

कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आज लोकसभेत एका लिहीत उत्तरामध्ये माहिती दिली की, २०१८ पासून, या महिन्याच्या २२ तारखेपर्यंत देशाच्या उच्च न्यायालयांमध्ये नियुक्त झालेल्या ६६१ न्यायाधीशांपैकी  २१ न्यायाधीश अनुसूचित जमाती प्रवर्गातले, ७८ इतर मागास वर्ग, आणि ४९९ न्यायाधीश खुल्या प्रवर्गातले आहेत.   उच्च न्यायालयांमध्ये होणाऱ्या न्यायाधीशांच्या नियुक्तीमध्ये सामाजिक विविधता राहावी, यासाठी, उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तींनी न्यायाधीशांच्या नियुक्तीचा प्रस्ताव पाठवताना, अनुसू...

July 4, 2024 8:22 PM July 4, 2024 8:22 PM

views 14

नवे फौजदारी कायदे नागरिकांसाठी जीवनसुलभता आणतील – मंत्री अर्जुनराम मेघवाल

नवे फौजदारी कायदे नागरिकांसाठी जीवनसुलभता आणतील असा विश्वास केंद्रीय आणि न्यायमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी व्यक्त केला आहे. ते आज उत्तरप्रदेशात गाझीयाबाद इथल्या सीबीआय अकादमीत बोलत होते. या कायद्यांमुळे न्यायदानाची गती वाढेल, आणि खटल्यांमधे खर्च होणारा सर्व संबंधितांचा वेळ वाचेल, असं ते म्हणाले.    यावेळी ३९ सीबीआय अधिकाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचं सेवापदक तसंच गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल भारतीय पोलीस पदक मेघवाल यांनी प्रदान केलं. 

July 1, 2024 1:23 PM July 1, 2024 1:23 PM

views 12

नवीन फौजदारी कायदे देशभरात लागू

भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक संरक्षण संहिता, आणि भारतीय साक्ष अधिनियम, हे नवीन फौजदारी कायदे देशभरात आजपासून लागू झाले. केंद्र सरकारने यासंदर्भात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत नियमित बैठका घेतल्या होत्या. या नवीन कायद्यांमध्ये चौकशी, सुनावणी आणि न्यायालयीन प्रक्रियेत तंत्रज्ञानावर अधिक भर देण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता - आयपीसी, द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर - सीआरपीसी आणि भारतीय पुरावा कायदा हे तीन कायदे कालबाह्य होत आहेत. नवीन फौजदारी कायदे लागू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, न्याया...