October 27, 2025 7:29 PM October 27, 2025 7:29 PM
27
अर्जेंटिनात ला लिब्रेटाड एवेंजा पक्षानं निर्णायक बहूमत मिळवलं
अर्जेंटिनात झालेल्या मध्यावधी निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष जेविअर मिलेई यांच्या नेतृत्वाखालील ला लिब्रेटाड एवेंजा पक्षानं निर्णायक बहूमत मिळवलं आहे. त्यांच्या पक्षाला ४१ टक्के मत मिळाली असून त्यांनी कायदेमंडळातल्या २४ पैकी १३ तर खालच्या सभागृहातील १२७ पैकी ६४ जागा जिंकल्या आहेत. अर्जेंटिनाच्या नागरिकांना पराभूत मानसिकता मान्य नाही हे या निकालातून स्पष्ट झाल्याचं त्यांनी निकालानंतर म्हटलं आहे.