July 8, 2025 7:58 PM

views 8

स्पेनमध्ये माद्रिद इथं आजपासून तिरंदाजी विश्वचषक स्पर्धा सुरु

स्पेनमध्ये माद्रिद इथे आज रात्री सुरू होणाऱ्या तिरंदाजी विश्वचषकाच्या चौथ्या टप्प्यात दीपिका कुमारी आणि ज्योती सुरेखा वेन्नम भारताचं नेतृत्व करतील. या स्पर्धेत ४९ देशांमधले ३३६ तीरंदाज सहभागी होणार असून ही स्पर्धा १३ जुलै पर्यंत सुरू असेल. या दोघींसह तरुणदीप राय, प्रणीत कौर, प्रीतिका प्रदीप हेही सहभागी होणार असून विजयी तीरंदाज यंदा ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी होतील.

May 11, 2025 8:45 PM

views 6

Archery World Cup : भारतीय तिरंदाज दीपिका आणि पार्थ यांना कास्य पदक

चीनमध्ये शांघाय इथं आयोजित तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत तिरंदाज दीपिका कुमारी आणि पार्थ साळुंखे यांनी कास्य पदकाची कमाई केली. दीपिकाने टोकियो ऑलिंपिक संघाच्या सुवर्णपदक विजेत्या कोरियाच्या कांग चाययुंगचा ७-३ असा पराभव केला. तर पार्थ साळुंखे याने पॅरिस ऑलिंपिक पदक विजेत्या फ्रान्सच्या बॅप्टिस्ट एडिसचा ६-४ असा पराभव केला. शांघाय तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताने दोन सुवर्ण, १ रौप्य आणि ४ कांस्य पदकांसह एकूण सात पदकांची कमाई केली आहे. 

May 10, 2025 2:31 PM

views 11

तिरंदाजी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात भारताने आज 3 पदकं  जिंकली

शांघायमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात भारताने आज तीन पदकं  जिंकली. पुरुष कंपाउंड स्पर्धेत  अभिषेक वर्मा, ओजस देवतळे आणि ऋषभ यादव यांच्या संघानं अंतिम सामन्यात मेक्सिकोच्या  संघाला  पराभूत करून सुवर्णपदक जिंकलं.  महिलांच्या कंपाऊंड स्पर्धेत ज्योती सुरेखा वेन्नम, मधुरा धामणगावकर आणि चिकिथा तानिपर्थी यांच्या संघानं अंतिम फेरीत रौप्यपदक जिंकलं.  मेक्सिकोच्या संघाकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. भारतानं  मिश्र सांघिक स्पर्धेतही कांस्यपदक जिंकलं. 

May 8, 2025 2:52 PM

views 10

तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांचा अंतिम फेरीत प्रवेश

शांघाय इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष संघानं उपांत्य फेरीत डेन्मार्कचा २३२-२३१ असा तर महिलांनी ग्रेट ब्रिटनचा २३२-२३० असा पराभव केला. अंतिम फेरीत भारतीय पुरुष संघाचा सामना येत्या १० मे रोजी मेक्सिकोशी होणार आहे.