October 15, 2025 3:18 PM October 15, 2025 3:18 PM
141
माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त राज्यात वाचन प्रेरणा दिन साजरा
भारतरत्न आणि माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉ कलाम हे द्रष्टे वैज्ञानिक, प्रेरणादायी नेते आणि देशभक्त होते. त्यांनी संरक्षण आणि विज्ञान क्षेत्रात, तसंच युवक सक्षमीकरणासाठी अथक प्रयत्न केले आणि देशाला आत्मनिर्भरतेच्या मार्गावर आणलं असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. डॉ कलाम यांच्या स्वप्नातल्या बलशाली, आत्मनिर्भर आणि दयाशील भार...