July 18, 2024 8:05 PM July 18, 2024 8:05 PM

views 8

नवी दिल्लीत नार्को-कोऑर्डिनेशन सेंटरच्या ७ वी उच्चस्तरीय बैठक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं नार्को-कोऑर्डिनेशन सेंटरची ७ वी उच्च स्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. भारतातली अमली पदार्थांची तस्करी आणि गैर वापर रोखण्यासाठी काम करत असलेल्या विविध केंद्र आणि राज्य सरकारी संस्थांच्या प्रयत्नांमध्ये समन्वय साधणं, हे या बैठकीचं उद्दिष्ट आहे.    अमली पदार्थांच्या समस्येचा सामना करण्यासाठी सरकारनं अमली पदार्थांच्या तस्करी विरोधात शून्य सहनशीलता धोरण स्वीकारल्याचं गृहामंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.   ...