April 19, 2025 3:12 PM April 19, 2025 3:12 PM

views 4

APEDA: महाराष्ट्रातून अमेरिकेला भारतीय डाळिंबाच्या निर्यातीची पहिली खेप पोचली

अपेडा, अर्थात कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात प्राधिकरणानं महाराष्ट्रातून अमेरिकेला भारतीय डाळिंबाच्या व्यावसायिक निर्यातीची पहिली खेप  पाठवली आहे. गेल्या आठवड्यात सागरी मार्गानं ‘भगवा’ जातीच्या भारतीय डाळिंबाच्या सुमारे १४ टन वजनाच्या चार  हजार ६२० पेट्यांची पहिली खेप अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचली असून ताज्या फळांच्या निर्यातीमधला हा महत्त्वाचा टप्पा असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं प्रसिद्ध  केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.    डाळिंबांचं शेल्फ लाईफ ६० दिवसांपर्यंत वाढ...

March 23, 2025 1:55 PM March 23, 2025 1:55 PM

views 11

गोळी सोड्याला आता नवी ओळख !

भारतात पूर्वीपासून मिळणारा गोळी सोडा आता साऱ्या जगात गोळी पॉप सोडा या नवाने ओळखला जाईल असं कृषी आणि प्रक्रीयाकृत अन्नपदार्थ विकास प्राधिकारणाने सांगितलं आहे. हे पेय जागतिक स्तरावर लोकप्रिय असून त्यातल्या नाविन्यामुळे ग्राहकांचं आकर्षण ठरत आहे. अमेरिका, युके, युरोपातले अन्य देश आणि आखाती देशांमधे या पेयाला मागणी वाढत असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.