July 22, 2025 7:03 PM July 22, 2025 7:03 PM
3
अपाचे हेलिकॉप्टर्सपैकी पहिली ३ हेलिकॉप्टर्स भारतात दाखल
अमेरिकेतून आयात केलेल्या बहुचर्चित अपाचे हेलिकॉप्टर्सपैकी पहिली ३ हेलिकॉप्टर्स आज भारतात दाखल झाली आहेत. मोठा शस्त्रसाठा वाहून नेण्याच्या तसंच इतर अत्याधुनिक लष्करी क्षमतांमुळे त्यांना ‘आकाशातला रणगाडा’ या नावानेही संबोधण्यात येतं. अमेरिकेकडून अशी एकूण २२ अपाचे हेलिकॉप्टर्स आयात करण्याचा निर्णय भारताने २०१५ साली घेतला होता. या हेलिकॉप्टर्समुळे भारताच्या संरक्षण सिद्धतेला मोठाच हातभार लागणार असून लष्करी उड्डाण विभागाला विविध प्रकारच्या भूप्रदेशात कार्यक्षम कर्तव्य बजावताना त्यांचा उपय...