April 5, 2025 7:13 PM April 5, 2025 7:13 PM

views 12

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा श्रीलंका दौरा विधायक परिणाम देणारा-विक्रम मिस्री

अनुरा कुमारा दिसानायके यांनी श्रीलंकेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिला परदेश दौरा भारताचा केला होता तसंच दिसनायके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर श्रीलंकेला भेट देणारे मोदी हे पहिलेच राष्ट्रप्रमुख आहेत,  अशी माहिती परराष्ट्रव्यवहार विभागाचे सचिव विक्रम मिस्री यांनी दिली. दोन्ही राष्ट्रांमधले बंध दृढ असल्याचं यावरुन दिसून येतं असं ते म्हणाले. प्रधानमंत्री मोदी यांचा हा श्रीलंका दौरा विधायक परिणाम देणारा असल्याची प्रतिक्रीया त्यांनी दिली. 

September 23, 2024 2:18 PM September 23, 2024 2:18 PM

views 12

श्रीलंकेचे राष्ट्रपती म्हणून अनुरा कुमारा दिस्सानायके यांचा शपथविधी

श्रीलंकेत नॅशनल पीपल्स पॉवर आघाडीचे  अनुरा कुमारा दिस्सानायके यांनी आज सकाळी श्रीलंकेचे नववे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दिस्सानायके यांनी सजिथा प्रेमदासा यांचा पराभव केला.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल दिस्सानायके यांचं  अभिनंदन केलं आहे. आपण एकत्र काम करुन दोन्ही देशांमधले संबध दृढ करु. दोन्ही देशांमधली जनता आणि आसपासच्या  क्षेत्राच्या भल्यासाठी काम करु असं मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

September 22, 2024 8:00 PM September 22, 2024 8:00 PM

views 2

नॅशनल पीपल्स पॉवरचे अनुरा कुमार दिसनायके श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत नॅशनल पीपल्स पॉवरचे अनुरा कुमार दिसनायके विजयी झाले आहेत. या निवडणुकीसाठी काल मतदान झालं. पहिल्या फेरीत कोणत्याही उमेदवाराला आवश्यक असलेली ५० टक्के मतं मिळाली नाहीत. त्यामुळे आघाडीच्या दोन उमेदवारांव्यतिरिक्त इतर सर्व उमेदवारांना वगळून त्यांना मिळालेली दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची मतं आघाडीच्या दोन उमेदवारांमध्ये विभागली गेली. त्यात सर्वाधिक मतं मिळाल्यानं दिसनायके यांना विजयी घोषित करण्यात आलं. सजिथ प्रेमदासा दुसऱ्या स्थानावर राहिले.