December 13, 2024 8:02 PM December 13, 2024 8:02 PM

views 9

देशात क्षयरोग ग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने घट – राज्यमंत्री अनुप्रिया पटेल

राष्ट्रीय धोरणात्मक योजनांच्या अंमलबजावणीमुळे देशात क्षयरोग ग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने घट झाली आहे. पुढच्या वर्षापर्यंत देशभरातून क्षयरोगाचं समूळ उच्चाटन करण्याचं लक्ष्य आहे, असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या. भारतात २०१५मध्ये क्षयरुग्णांच प्रमाण दर एक लाखामागे २३७ इतकं होतं. हे प्रमाण २०२३मध्ये दर एक लाखामागे १९५ इतकं घटलं आहे. तसंच, २०१५मध्ये क्षयरोगाने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दर एक लाखामागे २८ इतकी होती. ती ...

November 30, 2024 1:31 PM November 30, 2024 1:31 PM

views 3

सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम अर्थात यूआयपी अंतर्गत ७ कोटी ४३ लाख लाभार्थ्यांची नोंदणी

सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम अर्थात यूआयपी अंतर्गत सुमारे ७ कोटी ४३ लाख लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. गरोदर महिलांना तसंच नवजात ते १६ वर्षांपर्यंतच्या मुलांना १२ प्रकारच्या रोगांसाठी या कार्यक्रमांतर्गत जीवनरक्षक लस देण्यात येते. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.   संकेतस्थळावरल्या नोंदीनुसार १ कोटी २६ लाख लसीकरण सत्रं आयोजित करण्यात आली असून सुमारे २७ कोटी ७७ लाख लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. यूआयपीच्...

July 19, 2024 8:38 PM July 19, 2024 8:38 PM

views 7

देशाचा माता मृत्यू दर कमी होण्यासाठी सरकार कार्यरत – राज्यमंत्री अनुप्रिया पटेल

देशाचा माता मृत्यू दर कमी व्हावा, यासाठी सरकार काम करत असल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्ली इथं कुटुंब नियोजनाबाबतच्या तज्ज्ञांच्या बैठकीत बोलत होत्या. लोकसंख्या स्थिर राहावी, यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळू लागलं असून, २०३० सालापर्यंत माता मृत्यूचा दर एक लाख बालकांच्या जन्मामागे ७० पेक्षा कमी राखण्याचं शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करण्यात देशाला यश मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.