July 14, 2025 7:09 PM

views 24

विधिमंडळाच्या पुढच्या अधिवेशनात धर्मांतरविरोधी कायदा आणण्याची सरकारची ग्वाही

राज्य सरकार लवकरच धर्मांतरविरोधी कायदा आणेल, असं गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. दौंड तालुक्यात केडगाव इथल्या पंडिता रमाबाई मुक्ती मिशन संस्थेत शिकणाऱ्या मुलींवर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची जबरदस्ती, त्यांच्याशी चुकीची वर्तणूक इत्यादी आरोपांच्या अनुषंगानं आमदार उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक पदावरच्या महिला अधिकाऱ्याची समिती नेमली असून तिचा अहवाल एका महिन्यात मिळेल, त्यानंतर अहवालानुसार य...