September 15, 2025 8:32 PM September 15, 2025 8:32 PM
3
CRPF कोब्रा बटालीयन आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाला नक्षलवादविरोधी कारवाईत यश
सीआरपीएफ कोब्रा बटालीयन आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाला झारखंडमधे हजारीबाग इथं नक्षलवादविरोधी कारवाईत मोठं यश मिळालं आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे सांगितलं. एक कोटी इनाम असलेला जहाल नक्षलवादी सहदेव सोरेन या कारवाईत ठार झाला, तसंच रघुनाथ हेब्राम आणि बिरसेन गंझु हे दोन नक्षलवादीही मारले गेल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. झारखंडमधल्या बोकारो प्रदेशातून नक्षलवाद समूळ नष्ट झाला आहे, लवकरच संपूर्ण देश नक्षलवादमुक्त होईल असा विश्वास त्यानी व्यक्त केला.