October 14, 2024 10:46 AM October 14, 2024 10:46 AM
5
अमेरिका आणि भारत यांच्यातील वार्षिक शिखर परिषदेला काल नवी दिल्लीत सुरुवात
अमेरिका आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारी मंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक शिखर परिषदेला काल नवी दिल्लीत सुरुवात झाली. द्विपक्षीय व्यापार, पुरवठा साखळी, सेमीकंडक्टर गुंतवणूक, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञान सहकार्य वाढवणे हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्यानंतर ही परिषद होत आहे.