August 11, 2025 1:15 PM August 11, 2025 1:15 PM
13
भालाफेक स्पर्धेत अण्णू राणीची विजेतेपदाला गवसणी
भारतीय खुल्या जागतिक ॲथलेटिक्स ब्रॉन्झ लेवल कॉन्टिनेन्टल टूर स्पर्धेत भारताच्या अनू राणीने भालाफेकमध्ये विजेतेपद पटकावलं. ओडिशात भुवनेश्वर इथं सुरु असलेल्या या स्पर्धेत अनूने ६२ पूर्णांक एक शतांश मीटरवर भाला फेकून ही कामगिरी केली. पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत शिवम लोहकरने रौप्य पदक जिंकलं. पुरुषांच्या लांब उडी मध्ये मुरली श्रीशंकरने सुवर्ण पदक पटकावलं.