December 21, 2024 7:50 PM December 21, 2024 7:50 PM

views 3

देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनमोलप्रीत सिंगचा सर्वात जलद लिस्ट-ए शतकाचा विक्रम

देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाबच्या अनमोलप्रीत सिंगने सर्वात जलद लिस्ट ए शतकाचा विक्रम केला आहे. विजय हजारे करंडक स्पर्धेच्या क गटात अरुणाचल प्रदेशाविरोधात झालेल्या सामन्यात त्यानं केवळ ३५ चेंडूंमध्ये शतक झळकावलं, आणि भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाणचा ४० चेंडूमधील वेगवान शतकाचा विक्रम मोडला. अनमोलप्रीतच्या या वादळी खेळीमुळे पंजाबनं अरुणाचल प्रदेशावर ९ गडी राखून विजय मिळवला.