November 10, 2025 9:55 AM November 10, 2025 9:55 AM

views 20

ISSF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनिश भानवालला रौप्यपदक

इजिप्तमधील कैरो इथं सुरू असलेल्या, ISSFजागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल नेमबाजी प्रकारात, भारताच्या अनिश भानवालाने रौप्यपदक पटकावलं. या स्पर्धेतील हा ऐतिहासिक विजय आहे. अंतिम फेरीत अनिशने २८ लक्ष्ये गाठली. या उल्लेखनीय कामगिरीमुळे अनिश ऑलिंपिक स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय वैयक्तिक पिस्तूल नेमबाज ठरला आहे.

August 27, 2025 7:53 PM August 27, 2025 7:53 PM

views 10

आशियाई नेमबाजी स्पर्धेत अनीश भनवालाला रौप्यपदक

कझाकस्तान इथं सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय नेमबाज अनीश भनवाला याचं सुवर्णपदक अवघ्या एका गुणानं हुकलं आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. चीनच्या सू लियाबोफान यानं ३६ गुणांसह सुवर्णपदक पटकावलं, तर दक्षिण कोरियाच्या स्पर्धकानं कांस्यपदक मिळवलं.   स्पर्धेच्या वरिष्ठ गटाच्या पदकतालिकेत चीन १५ सुवर्णपदकांसह २७ पदकं मिळवून पहिल्या स्थानावर आहे, तर ९ सुवर्णपदकांसह २३ पदकं मिळवून भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.