January 23, 2025 7:38 PM January 23, 2025 7:38 PM
17
ज्येष्ठ कवी, लेखक अनिल सोनार यांचं निधन
ज्येष्ठ कवी, लेखक अनिल सोनार यांचं आज धुळे इथं निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर शहरातल्या स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. सोनार यांची २१ नाटकं, तीन कादंबऱ्या, सहा काव्य संग्रह, ३८ एकांकिका, एक आस्वादक समीक्षापर लेख संग्रह, एक विनोदी लेख संग्रह, पाच बालकथा संग्रह, दोन एकांकिका, एक हिंदी नाटक, दोन कथा संग्रह इतकं साहित्य प्रकाशित आहे.