November 19, 2024 1:30 PM November 19, 2024 1:30 PM

views 11

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक, राजकीय वर्तुळात खळबळ

नागपुरात पारडशिंगा इथे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर काल रात्री दगडफेक झाली. या घटनेत देशमुख यांच्या डोक्याला मार लागला असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.   हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी विधानसभा मतदारसंघातले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्या गाडीवर रात्री दगडफेक झाली. त्यांत डोक्याला मार लागल्याने मस्के यांच्यावर नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

September 2, 2024 3:42 PM September 2, 2024 3:42 PM

views 17

शक्ती कायदा तातडीनं मंजूर करण्याची अनिल देशमुख यांची मागणी

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद असलेला शक्ती कायदा तातडीनं मंजूर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अनिल देशमुख यांनी केली आहे. ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. या मागणीसाठी उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महिला आघाडी आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विधिमंडळानं संमत केलेला हा कायदा तीन वर्षांपासून केंद्र सरकारकडं मान्यतेसाठी पडून आहे. तो केंद्राने लवकरात लवकर मंजूर करून राज्यात ...

August 3, 2024 4:04 PM August 3, 2024 4:04 PM

views 15

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या विरोधात केलेले आरोप खोटे – देवेंद्र फडणवीस

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या विरोधात केलेले आरोप खोटे असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलिस अधिकारी सचिन वाजे यांच्या आधारे नागपुरात सांगितलं. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना अटक करण्याचं प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर दबाव टाकला, असा आरोप अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयानं सचिन वाजे याच्या गुन्हेगारी प्र...