December 9, 2025 7:21 PM December 9, 2025 7:21 PM
17
अनिल अंबानीच्या २ कंपनी विरोधात सीबीआयकडून FIR दाखल
सुमारे १४ हजार ८०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयनं अनिल धीरुभाई अंबानी उद्योगसमूहातल्या दोन कंपन्यांविरोधात आज एफआयआर दाखल केले. रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स विरोधात हे गुन्हे दाखल झाले आहेत. युनियन बँकेला २२८ कोटी रुपयांना फसवल्या प्रकरणी कंपनीचा तत्कालीन संचालक - अनिल अंबानींचा पुत्र जयअनमोल अंबानी तसंच कंपनीचा माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शरद सुधाकर यांना आरोपी बनवलं आहे. बँक ऑफ महाराष्ट्रला ५७ कोटी रुपयांना फसवल्याचाही कंपनी...