August 12, 2025 3:02 PM August 12, 2025 3:02 PM

views 11

अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपती मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी

अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या गणपती मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे. रत्नागिरी तालुक्यात गणपतीपुळे इथल्या गणपती मंदिरात आकर्षक आरास करण्यात आली असून रात्री साडे दहा वाजेपर्यंत भाविकांना मंदिरात दर्शन करता येणार आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनासह सर्व शासकीय यंत्रणांनी नियोजन केलं आहे. याखेरीज गणेशगुळे, आंजर्ले तालुक्यातल्या कड्यावरचा गणपती, गुहागर इथल्या हेदवीचा दशभुजा गणेश अशा विविध मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.