July 16, 2024 1:13 PM

views 17

अंगणवाडी मदतनीसांची 14,690 रिक्त पदे लवकरच भरणार

राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची 14 हजार 690 रिक्त पदं लवकरच भरण्यात येणार असल्याची माहिती, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण आणि आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रांमध्ये मदतनीसांची अनेक जागा रिक्त आहेत.   येत्या 31 ऑगस्ट अखेर राज्यातील मदतनीसांची रिक्त पदे भरण्यात यावीत, अशा सूचना सर्व जिल्हा आणि प्रकल्प स्तरावर देण्यात आल्या आहेत; याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार असल्याचं तटकरे यांनी सांगितलं. &...