August 3, 2025 7:58 PM August 3, 2025 7:58 PM
1
AndhraPradesh : ग्रॅनाइटच्या खाणीतल्या दुर्घटनेत ६ कामगारांचा मृत्यू
आंध्र प्रदेशातल्या बापटला जिल्ह्यात आज सकाळी ग्रॅनाइटच्या एका खाजगी खाणीत काठावरचे मोठे दगड कोसळल्यानं झालेल्या अपघातात किमान ६ कामगारांचा मृत्यू झाला आणि ८ जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये ओदिशामधल्या स्थलांतरित कामगारांचा समावेश आहे. खाणीचा काठ कोसळला तेव्हा खाणीत १५ ते २० कामगार काम करत होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं आणि जखमींना रुग्णालयात दाखल केलं. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल खेद व्यक्त केला. तसंच, बचावकार्य तातडीनं पूर्...