October 29, 2025 1:40 PM October 29, 2025 1:40 PM
360
मोंथा वादळ पूर्व किनाऱ्यावर धडकलं, वादळाच्या प्रभावामुळे अनेक राज्यांमधे मुसळधार पाऊस
मोंथा चक्रीवादळ काल रात्री ९० ते १०० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने आंध्र प्रदेश आणि यानम इथल्या किनाऱ्यावरून मछलीपट्टणम आणि कलिंगपटणमच्या मधून पुढे सरकलं. किनारपट्टीवर धडकल्यानंतर मोंथाची तीव्रता कमी झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशातल्या श्रीकाकुलम, विशाखापट्टण, नेल्लोर, काकिनाडा जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झालं. कोनासीमा इथं सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाड पडून एकाचा मृत्यू झाला. वादळामुळे ४८ हजार हेक्टरवरची पिकं आणि जवळपास दीड लाख हेक्टरवरच्या फळबागांना मोठा फ...