July 14, 2025 2:30 PM July 14, 2025 2:30 PM
12
आंध्र प्रदेश: अन्नमय्या जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात नऊ जणांचा मृत्यू
आंध्र प्रदेशातल्या अन्नमय्या जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. राजमपेटहून आंबे घेऊन जाणारा एक ट्रक रेडीपल्ली तलावाच्या कडेला उलटल्यानं ही दुर्घटना घडली. जखमींना नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस. अब्दुल नजीर यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.