September 6, 2024 12:44 PM September 6, 2024 12:44 PM

views 15

आंध्रप्रदेशातल्या बुडामेरू कालव्यातील भगदाड पडल्यामुळे निर्माण झालेली पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय लष्कर तैनात

आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा इथल्या बुडामेरू कालव्याला भगदाड पडल्यामुळे निर्माण झालेली पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय लष्कर तैनात करण्यात आले आहेत. राज्य सरकारने लष्कराकडे मदत मागितल्यानंतर लष्करी अभियंता कृती दलाच्या ४० अभियंत्यांना हवाई मार्गाने विजयवाडा इथं नेण्यात आलं आहे. सैन्याच्या अतिरिक्त तुकड्याही तैनातीसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. भगदाड बुजवण्यासाठी, पूरस्थितीचं निरीक्षण करण्यासाठी आणि पूरबाधित रहिवाशांचं स्थलांतर करण्यासाठी स्थानिक प्रशासन आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचा...

September 6, 2024 10:24 AM September 6, 2024 10:24 AM

views 5

आंध्रप्रदेश आणि तेलंगणतील पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदतीसाठी केंद्र सरकार कटिबद्ध – कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

आंध्रप्रदेशात आलेल्या पुरामुळे अंदाजे दीड लाख हेक्टरहून जास्त क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं असून, २ लाख शेतकाऱ्यांना फटका बसला आहे असं केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हंटलं आहे. विशेषत: हळद आणि फूल पिकांना अतिवृष्टीची झळ बसल्याचं त्यांनी सांगितलं. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील पूरस्थितीची पाहणी करण्याकरता चौहान कालपासून दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी विजयवाडा, प्रकाशम धरण तसंच कृष्णा नदी लगतच्या पूरग्रस्त शेतांची हवाई पाहणी केली. पंचनामे करण्याची प्रक्रिया सुर...

September 5, 2024 12:50 PM September 5, 2024 12:50 PM

views 7

आंध्रप्रदेशातल्या पूरग्रस्त भागाची केंद्रीय पथक आज पाहणी करणार

आंध्रप्रदेशातल्या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज केंद्रीय गृहविभागाचे अतिरिक्त सचिव संजीव कुमार जिंदाल यांच्या नेतृत्वाखालचं पथक जात आहे. अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यापूर्वी या पथकानं ताडपल्ली इथं आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.  देशाच्या पश्चिम आणि मध्य भागात सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्रविभागाने व्यक्त केली आहे, छत्तीसगड मधे पुढचे सहा दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून सौराष्ट्र आणि कच्छमधे उद्यापर्यंत जोरदार पाऊस राहील....

September 3, 2024 3:18 PM September 3, 2024 3:18 PM

views 31

आंध्रप्रदेशात पूरग्रस्त भागात युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू

आंध्रप्रदेशात एनटीआर आणि गुंटूर या जिल्ह्यांमधल्या  पूरग्रस्त भागात मदत कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. NDRF आणि राज्य आपत्ती प्रतिसाद संस्था हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या मदतीनं पूरग्रस्त भागातल्या नागरिकांची सुटका करत आहेत. आतापर्यंत जवळजवळ ४२ हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.    आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी काल रात्री राज्यातल्या पुरस्थितीचा आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांना बचाव कार्यावर देखरेख ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, विजयवाडा आणि हैदराबादला जोडणाऱ्...

September 2, 2024 9:34 AM September 2, 2024 9:34 AM

views 25

आंध्र प्रदेश, तेलंगणमधील पूरस्थितीचा प्रधानमंत्र्यांनी घेतला आढावा

  प्रधानमंत्रीं नरेंद्र मोदी यांनी काल आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दूरध्वनी करुन तिथल्या पूरस्थितीचा आढावा घेतला. दोन्ही राज्यांना शक्य ती सर्व मत करण्याचं आश्वासन प्रधानमंत्र्यांनी दिलं आहे. राज्य सरकार युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य करत आहे. विजयवाडा जिल्ह्यात पुरामुळे बुडामेरू ओढ्याला तडा गेल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पूरग्रस्त भागाला भेट देऊन नागरिकांना अन्न, पाणी आणि आवश्यक औषधांचा व्यवस्थित पुरवठा करावा असे आदेश अधिका...

August 22, 2024 1:25 PM August 22, 2024 1:25 PM

views 14

आंध्रप्रदेशमध्ये औषध निर्माण कंपनीत अणुभट्टीच्या स्फोटात १७ ठार, २० हून अधिक जखमी

आंध्रप्रदेशातील अनकापल्ली जिल्ह्यातल्या अच्युतापुरम सेझमधल्या औषध निर्माण कंपनीत काल झालेल्या अणुभट्टी स्फोटात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी स्फोटात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहवेदना व्यक्त केली आहे.     प्रधानमंत्री मोदी यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी दोन लाख रूपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रूपयांची मदत...