November 19, 2025 3:27 PM November 19, 2025 3:27 PM
44
सत्यसाईबाबा यांचं जन्मशताब्दी वर्ष जागतिक शांतता, प्रेमाचं महापर्व असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
सत्यसाईबाबा यांचं जीवन वसुधैव कुटुंबकम याचं उदाहरण आहे. त्यामुळे त्यांचे हे जन्मशताब्दी वर्ष जागतिक शांतता, प्रेमाचं महापर्व असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज काढले. आंध्र प्रदेशातल्या पुट्टपर्थी इथं श्री सत्यसाईबाबा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सत्य साई बाबा यांच्या सन्मानार्थ काढलेल्या विशेष नाण्याचं आणि टपाल तिकीटाचं प्रकाशन झालं. सत्यसाईबाबांनी अध्यात्माला जनसेवेशी जोडले. मानव सेवा ही मा...