August 5, 2025 2:42 PM August 5, 2025 2:42 PM

views 26

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिका बरोबरीत सुटल्यामुळे भारत जागतिक कसोटी विजेतेपदाच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेत इंग्लंडबरोबर साधलेल्या गुणांच्या बरोबरीमुळे भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ओव्हल इथे झालेल्या या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंड गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर होता. काल झालेल्या या मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात भारतानं इंग्लंडवर विजय मिळवत २-२ अशी बरोबरी साधली. ५ गडी बाद करणारा मोहम्मद सिराज हा सामनावीर ठरला. शुभमन गिल आणि हॅरी ब्रुक हे दोघं मालिकावीर ठरले. या विजयामुळे भारताच्या खात्यात १२ गुणांची भर पडली असून भारत...

August 4, 2025 1:39 PM August 4, 2025 1:39 PM

views 11

अँडरसन – तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या सामन्यात इंग्लंड विजयाच्या उंबरठ्यावर

लंडनच्या केनिंगटन ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात काल चौथ्या दिवशी अपुऱ्या उजेडामुळं खेळ थांबवण्यात आला तेव्हा इंग्लंडच्या दुसऱ्या डावात सहा गडी बाद ३३९ धावा झाल्या होत्या. ज्यो रूटनं १०५ आणि हॅरी ब्रुकनं १११ धावा केल्या. आज पाचव्या दिवशी सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला ३५ धावांची तर भारताला विजयासाठी चार बळींची आवश्यकता आहे. 

July 31, 2025 2:58 PM July 31, 2025 2:58 PM

views 35

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतला अंतिम सामना आजपासून ओव्हल मैदानावर

भारत आणि इंग्लंड यांच्यात अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि अंतिम सामना आज लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरु होत आहे. मालिकेतला चौथा सामना अनिर्णित राहिल्यामुळं सध्या इंग्लडकडे २-१ अशी आघाडी आहे.   अंतिम सामन्यात विजय मिळवून  मालिकेत बरोबरी साधण्याची संधी भारताला आहे. गेल्या चार सामन्यात एकदाही नाणेफेकीचा कौल भारतीय कर्णधार शुभमन गिलच्या बाजूनं लागला नाही. या सामन्यात यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला विश्रांती देण्यात आली आहे.  सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार साडेतीन वाजता सुरु...

July 28, 2025 2:37 PM July 28, 2025 2:37 PM

views 13

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेत चौथा सामना अनिर्णित

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेत मँचेस्टर इथला चौथा सामना अनिर्णित राहीला. अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना अनिर्णित राखण्यात काल भारतीय संघाला यश मिळालं.  कर्णधार शुभमन गिल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांची झुंजार शतकं तर के एल राहुलच्या ९० धावा ही डावाची वैशिष्ट्यं ठरली. वॉशिंग्टन सुंदरचं हे कारकिर्दीतलं पहिलं शतक होतं. यजमान संघाच्या ३११ धावांच्या आघाडीला प्रत्युत्तर देताना सामना अनिर्णित ठेवत दुसऱ्या डावात भारताने ४ बाद ४२५ धावा केल्या. यामध्ये जडेजा आणि सुंदर य...

July 14, 2025 8:20 PM July 14, 2025 8:20 PM

views 8

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारत पराभवाच्या छायेत

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारत पराभवाच्या छायेत आहे. लॉर्ड्स मैदानावर सुरु असलेल्या या सामन्याच्या पहिल्या डावात दोन्ही संघांनी प्रत्येकी ३८७ धावा केल्या होत्या. इंग्लडचा दुसरा डाव १९२ धावांवर गुंडाळण्यात आज भारताला यश आलं. मात्र या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी पूर्णपणे गडगडली. यशस्वी जैस्वाल आणि वॉशिंग्टन सुंदर एकही धाव न करता तंबूत परतले.    शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या ९ बाद १४९ धावा झाल्या होत्या.

July 11, 2025 3:09 PM July 11, 2025 3:09 PM

views 9

Anderson Tendulkar Trophy: तिसऱ्या सामन्यातल्या दुसरा दिवसाचा खेळ आज दुपारी 3:30 वाजता

अँडरसन-तेंडुलकर कसोटी मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यातल्या दुसरा दिवसाचा खेळ आज दुपारी साडे तीन वाजता सुरू होईल. पहिल्या दिवसअखेर इंग्लंडच्या चार बाद २५१ धावा झाल्या होत्या. भारताकडून नितीश कुमार रेड्डीने दोन, तर रविंद्र जडेजा आणि जसप्रित बुमराहनं प्रत्येकी एक गडी बाद केला.

July 7, 2025 2:39 PM July 7, 2025 2:39 PM

views 14

Anderson-Tendulkar Trophy : दुसऱ्या सामना ३३६ धावांनी जिंकून भारताची ऐतिहासिक कामगिरी

इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम इथं झालेल्या अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट स्पर्धेचा दूसरा सामना भारतानं ३३६ धावांनी जिंकून ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. या विजयामुळे भारतानं  मालिकेत १-१ बरोबरी साधली आहे. धावांचा विचार करता भारताचा हा परदेशातील सर्वांत मोठा विजय ठरला आहे. तर भारतानं प्रथमच कसोटीत १ हजार पेक्षा धावा केल्या आहेत. काल सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी इंग्लंडने ३बाद ७२ धावांवरून डाव सुरू केल्यानंतर  विजयासाठी ६०८ धावांचं उद्दिष्ट गाठताना यजमान संघाचा डाव २७१ धावांवर आटोपला. आकाशदीपन...

July 5, 2025 8:12 PM July 5, 2025 8:12 PM

views 17

अँडरसन – तेंडूलकर कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताकडे ४०० हून अधिक धावांची आघाडी, शुभमन गिल शतकाच्या उंबरठ्यावर

अँडरसन - तेंडुलकर चषक क्रिकेट स्पर्धेतल्या, दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या ४ गडी बाद ३०४ धावा झाल्या आहेत. त्यामुळं भारताकडे एकूण ४८४ धावांची आघाडी झाली आहे. पहिल्या डावात द्विशतक ठोकणारा कर्णधार शुभमन गिल यानं या डावात नाबाद शतक ठोकलं. केएल राहुल आणि ऋषभ पंत वेगवान अर्धशतक करुन बाद झाले.  

July 4, 2025 2:56 PM July 4, 2025 2:56 PM

views 13

अँडरसन-तेंडुलकर चषक स्पर्धेच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत कर्णधार शुभमन गिल याचं ऐतिहासिक द्विशतक

अँडरसन-तेंडुलकर करंडकासाठी इंग्लंडमध्ये एजबस्टन इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल यानं द्विशतक झळकावून इतिहास रचला. इंग्लंडमधील कसोटी सामन्यात द्विशतक करणारा तो पहिला भारतीय तसंच पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे. गिलनं केलेल्या दमदार २६९ धावांमुळे भारताला ५८७ एवढी भक्कम धावसंख्या उभारता आली; त्यामुळे पहिल्या डावात संघाची स्थिती भक्कम झाली आहे. काल दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यजमान इंग्लंडच्या संघाच्या तीन गडी बाद ७७ या धावा झाल्या.

June 24, 2025 3:31 PM June 24, 2025 3:31 PM

views 8

Anderson-Tendulkar Trophy : भारताचं इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचं उद्दिष्ट

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या अँडरसन - तेंडुलकर चषकाच्या हेडिंग्ले इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचं आव्हान ठेवलं आहे. दुसऱ्या डावात भारताने ३६४ धावा केल्या असून उपकर्णधार ऋषभ पंतने ११८ धावा फटकावल्या. दोन्ही डावात शतक झळकवणारा तो पहिला भारतीय यष्टिरक्षक फलंदाज ठरला आहे. के एल राहुलनेदेखील १३७ धावा केल्या. तर शेवटचे तीन फलंदाज शून्यावर बाद झाले. काल दिवसअखेर इंग्लंडने एकही गडी न गमावता २१ धावा केल्या. सामन्याचा आज अखेरचा दिवस आहे.