July 14, 2025 1:06 PM July 14, 2025 1:06 PM

views 6

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला विजयासाठी १३५ धावांची गरज

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारताला विजयासाठी १३५ धावांची गरज आहे.  लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात इंग्लडचा दुसरा डाव १९२ धावांवर संपला. दिवस अखेर भारताच्या दुसऱ्या डावात ४ बाद ५८ धावा झाल्या होत्या.    रात्रीचा रखवालदार म्हणून आलेल्या आकाशदीपला इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स ने दिवसातल्या शेवटच्या चेंडूवर तंबूत परत पाठवलं. पहिल्या डावात शतक झळकावणारा के एल राहुल ३३ धावांवर खेळत आहे.   आज सामन्याचा अखेरचा दिवस आहे.  मालिकेत दोन्ही संघांनी आतापर्यंत ...

July 12, 2025 7:26 PM July 12, 2025 7:26 PM

views 4

अँडरसन-तेंडुलकर कसोटी मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात के. एल. राहुलची शतकी खेळी

भारत आणि इंग्लडदरम्यान अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट स्पर्धेत तिसऱ्या सामन्यात चुरस निर्माण झाली आहे. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर यजमान इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या दिवशी भारतानं ३ गडी बाद १४५ धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली. के. एल. राहुल यानं कसोटीतलं दहावं शतक झळकवलं. तर रिषभ पंतने ७४ धावा फटकावल्या.   शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या ५ गडी बाद २७८ धावा झाल्या होत्या.