December 7, 2024 7:35 PM December 7, 2024 7:35 PM

views 4

अनंत भालेराव स्मृती पुरस्कार माजी महासंचालक डॉ.मीरा चड्डा बोरवणकर यांना उद्या प्रदान केला जाणार

महाराष्ट्र राज्याच्या पोलीस संशोधन आणि विकास विभागाच्या माजी महासंचालक डॉ.मीरा चड्डा बोरवणकर यांना उद्या छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अनंत भालेराव प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा 'अनंत भालेराव स्मृती पुरस्कार' प्रदान केला जाणार आहे. रूपये ५०हजार, मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. यावेळी डॉ.मीरा बोरवणकर यांचं ‘पोलीस, राज्यकर्ते, समाज:आव्हाने आणि उपाय’ ह्या विषयावर भाषण होणार आहे.