March 20, 2025 10:21 AM March 20, 2025 10:21 AM

views 8

राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यानात उद्यम उत्सवाचं आयोजन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दिल्लीत राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान इथं आयोजित उद्यम उत्सवात सहभागी होणार आहेत . केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने याचं आयोजन केल असून, या उद्योगांतून तयार होणाऱ्या भारतीय पारंपरिक वस्तूंच्या उत्पादनांना प्रोत्साहन आणि बाजारपेठ मिळवून देणं, हा या उत्सवामागचा उद्देश आहे.   यामध्ये, महिला स्वयं सहाय्यता गट, प्रधानमंत्री विश्वकर्मा आणि आदिवासी योजनेतील लघु उद्योजक तसच खादी आणि इतर ग्रामीण लघु उद्योजक यांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांच प्रदर्शन...

January 21, 2025 1:37 PM January 21, 2025 1:37 PM

views 14

राष्ट्रपती भवनातलं ‘अमृत उद्यान’ येत्या २ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुलं

नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनातलं अमृत उद्यान येत्या २ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुलं होणार आहे. येत्या ३० मार्चपर्यंत आठवड्याचे ६ दिवस सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळात कोणालाही या उद्यानाची शोभा पाहता येईल. राषट्रपती भवनाच्या संकेतस्थळावर त्याच्या विनामूल्य प्रवेशिका उपलब्ध आहेत. देशाच्या समृद्ध परंपरेचं दर्शन घडवणारा विविधता का अमृत महोत्सव येत्या ६ मार्चपासून अमृत उद्यानात साजरा करण्यात येणार आहे.

August 13, 2024 8:18 PM August 13, 2024 8:18 PM

views 10

राष्ट्रपती भवनात अमृत उद्यान २०२४चं उद्या उद्घाटन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या राष्ट्रपती भवनात वार्षिक उन्हाळी अमृत उद्यान २०२४चं उद्घाटन करणार आहेत. हे ​​उद्यान १५ सप्टेंबरपर्यंत जनतेसाठी खुलं राहणार आहे. उद्यानातल्या काही प्रमुख आकर्षणांत बोन्साय गार्डन, सेंट्रल लॉनमधील दुर्मिळ आणि विदेशी फुलांचे लँडस्केप, लांबलचक रोझ गार्डन, भव्य वटवृक्ष, ट्री हाऊससह बाल वाटिका आणि परस्परसंवादी साउंड पाईप प्रदर्शन यांचा समावेश आहे. यावर्षी प्रथमच २९ ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिनी अमृत उद्यानात खेळाडूंना आमंत्रित करण्यात आलं आहे. अभ्यागतांच्या सुविधेसाठी क...