November 2, 2025 4:21 PM November 2, 2025 4:21 PM

views 84

नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी एक ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्र मिळणार

उद्योग आणि कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्राला आघाडीवर न्यायच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्र शासनानं मंजूर केलं आहे. या अंतर्गत, ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग अर्थात, संशोधन, नवसंकल्पना आणि उद्योजकता वाढीला लावण्याकरता मार्गदर्शन आणि प्रशिक्षण केंद्र सुरु होणार आहे.   उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीला पत्र लिहून अशा प्रकारची केंद्र सुरु करण्याविषयी स...

August 3, 2025 6:40 PM August 3, 2025 6:40 PM

views 23

Amravati : शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी इथं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचं भूमीपूजन आणि कोनशिला अनावरण झालं. शेतकऱ्यांकडे कृषीच्या जोडीला एखादा जोडधंदा असेल तर त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. मत्स्योत्पादनाद्वारे हे उद्दिष्ट साधलं जाऊ शकत, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. प्रधानमंत्र्यांच्या दृष्टिकोनानुसार आपल्या नद्या आणि तलावांचा वापर करून देशात नीलक्रांती करण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं.

November 5, 2024 7:35 PM November 5, 2024 7:35 PM

views 11

राष्ट्रपती भवनात आयोजित ‘सृजन २०२४’ निवासी कला शिबिरात अमरावतीतल्या सुमित्रा आहके सहभागी

राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या सृजन २०२४ या दहा दिवसांच्या निवासी कला शिबिरात अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटातल्या सुमित्रा आहके सहभागी झाल्या होत्या. या शिबिरात सुमित्रा यांनी काढलेली वारली चित्रं, गाव आणि शहरातील फरक दर्शविणारं चित्र, देवस्वरुप मानला जाणारा वाघ आणि लुप्त होत चाललेले आदिवासी कलाप्रकार रेखाटले. शिबिरासाठी निवडलेल्या १५ जणांमध्ये सुमित्रा आहके यांना दुसरा क्रमांक मिळाला. शिबिराच्या समारोपावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी सुमित्रा आहके यांना प्रमाणपत्र, चषक आणि भेटवस्तू देऊन सन्मानित ...

October 8, 2024 7:40 PM October 8, 2024 7:40 PM

views 18

नाशिक आणि अमरावती इथं झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू, दोन जखमी

नाशिक आणि अमरावती इथं आज झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले.  नाशिक इथं कारचं टायर फुटून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. तर अमरावती इथं ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एक जणाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जमावाने ट्रकचालकाला पकडून पोलिसांच्या हवाली केलं आहे.    दरम्यान, नांदेड जिल्ह्यातल्या मसलगा इथं वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

September 23, 2024 3:04 PM September 23, 2024 3:04 PM

views 8

अमरावतीत खासगी बस नदीत कोसळून झालेल्या अपघातात ४ ठार, २५ जखमी

अमरावती जिल्ह्यात मेळघाटातल्या सेमाडोह परिसरात आज खासगी बस पुलावरून नदीत कोसळून झालेल्या अपघातात ४ जण ठार तर २५ जण जखमी झाले. यापैकी ७ जणांची प्रकृती गंभीर आहे. ही बस अमरावतीहून धारणीच्या दिशेने प्रवास करत होती. चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस पुलावरून नदीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. बसमधले अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून व्याघ्र प्रकल्पाचे कर्मचारी आणि पोलीस पथक मदतकार्य करत आहेत.

June 17, 2024 3:35 PM June 17, 2024 3:35 PM

views 20

‘नवनीत राणांच्या पराभवामुळे अमरावतीचा विकास वीस वर्षे मागे गेला’

अमरावती लोकसभा मतदारसंघात अनेक विकासकामं केलेली असतानाही महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाल्यानं त्याचं चिंतन आपण करत असल्याचं स्वाभीमानी पक्षाचे नेते, आमदार रवी राणा यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. तसंच नवनीत राणा यांच्या पराभवामुळे अमरावती जिल्ह्याचा विकास वीस वर्षे मागे गेला असंही ते म्हणाले. महाविकास आघाडीने अपप्रचार, खोटी आश्वासनं, खोटी प्रलोभनं देऊन जनतेची दिशाभूल केली असा आरोपही राणा यांनी केला.