October 13, 2025 5:38 PM
16
केरळमध्ये मेंदुच्या प्राणघातक संसर्गामुळे आणखी एकाचा मृत्यू
केरळमध्ये अमिबिक एन्सेफलायटिस या मेंदुच्या प्राणघातक संसर्गामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण तिरुवनंतपुरम वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार घेत होता. याच रुग्णालयात संबंधित संसर्गग्रस्त असलेल्या १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दूषित पाण्यामध्ये आढळणाऱ्या जिवंत अमिबामुळे हा संसर्ग होतो. गेल्या दीड महिन्यात केरळमध्ये या संसर्गामुळे १५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वांनी क्लोरिनयुक्त पाणी वापरावं, तसंच अस्वच्छ तलाव आणि जलाशयांमध्ये पोहणं किंवा आंघोळ करणं टाळावं असा सल्ला केरळच...