September 12, 2024 1:48 PM September 12, 2024 1:48 PM
14
जम्मू – काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात दारूगोळा आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त
जम्मू - काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दारूगोळा आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला आहे. यासंदर्भात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलीस यांनी केरन विभागात संयुक्तपणे ही कारवाई केली. त्यात ए के-47 आणि आर.पी.जी च्या फैरी तसंच ई ए डी आणि हातबॉम्ब यांचा मोठा साथ हाती लागला. विशेष निवडणूक निरीक्षकांकडून ह्या संदर्भातली खबर कळल्याचं श्रीनगर इथल्या संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं सांगितलं. यामुळे मोठा धोका टळला असून यामुळे इथली परिस्थिती स्थिर आणि शांत राहू शकेल...