December 26, 2025 9:25 AM December 26, 2025 9:25 AM
2
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथं दहशतवाद विरोधी परिषदेचं आयोजन
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्ली इथं दहशतवाद विरोधी परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. दोन दिवसांच्या या परिषदेमध्ये राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवादामुळं उद्भवणारे धोके या विषयावर चर्चा करण्यात येईल. दहशतवाद विरोधी कार्यात सहभागी असलेले सुरक्षा दलातील अधिकारी, आणि न्यायवैद्यक पथकातील अधिकारी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. दहशतवादाविरोधातील कारवाईसाठी संबंधित विविध घटकांमध्ये समन्वय निर्माण करण्याच्या उद्देशानं ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.