September 14, 2024 9:24 AM September 14, 2024 9:24 AM

views 9

अंदमान निकोबारमधल्या पोर्ट ब्लेअरचं नामांतर ‘श्री विजय पुरम’ होणार

केंद्र सरकारने, अंदमान आणि निकोबर बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेयरचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता या शहराचं नामांतर ‘श्री विजय पुरम’ असं करण्यात येणार आहे.   केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी काल समाज मध्यमांवरील संदेशातून ही घोषणा करताना, वासहातवादी साम्राज्याच्या सर्व पाऊलखुणा मिटवून टाकण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.   देशाच्या इतिहासात पोर्ट ब्लेयरला अनन्यसाधारण महत्व असून, ‘श्री विजय पुरम’ हे देशाने स्वातंत्र्यलढ्यात मिळवलेल्या विजयाच...

September 11, 2024 2:38 PM September 11, 2024 2:38 PM

views 8

सायबर गुन्ह्यांना अटकाव घालण्यासाठी येत्या ५वर्षांत ५हजार सायबर कमांडोना प्रशिक्षण देण्याची योजना

सायबर सुरक्षा हा राष्ट्रीय सुरक्षेचा अविभाज्य भाग असून केंद्राने सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी येत्या पाच वर्षांत पाच हजार सायबर कमांडोना प्रशिक्षण देण्याची योजना आखली आहे. अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंट-आय फोर सी-च्या अर्थात भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या पहिल्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात दिली. सायबर गुन्ह्यांना सीमा नसल्यामुळे या धोक्याचा सामना करण्यासाठी सर्व संबंधितांनी एकत्र येण्याचं आवाहन शहा यांनी केलं.

September 10, 2024 1:28 PM September 10, 2024 1:28 PM

views 10

भारतीय सायबर अपराध प्रतिबंधक समन्वय केंद्राच्या ४ नवीन यंत्रणांचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

सायबर सुरक्षा हा विषय केवळ डिजिटल व्यवहारांपुरता सीमित राहिला नसून देशाच्या संरक्षण यंत्रणेचं अविभाज्य अंग बनला असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. आय फोर सी म्हणजेच भारतीय सायबर अपराध प्रतिबंधक समन्वय केंद्राच्या पहिल्या वर्धापन दिन सोहळ्यात आज नवी दिल्ली इथं ते बोलत होते. जगातल्या एकूण डिजिटल व्यवहारांपैकी जवळजवळ निम्मे व्यवहार भारतात होतात,त्यामुळे भारतात सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञान आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सायबर गुन्ह्यांविषयीच्य...

September 10, 2024 9:48 AM September 10, 2024 9:48 AM

views 6

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संसदीय राजभाषा समितीच्या अध्यक्षपदी एकमतानं फेरनिवड

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संसदीय राजभाषा समितीच्या अध्यक्षपदी एकमतानं फेरनिवड झाली आहे. नव्या सरकारच्या स्थापनेनंतर राजभाषा संसदीय समितीची पुनर्रचना करण्यासाठी काल नवी दिल्लीत समितीची बैठक झाली. त्यात ही निवड करण्यात आली. सर्व सरकारी यंत्रणांमध्ये 2047 पर्यंत भारतीय भाषांचा वापर केला जाण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेनं सरकार वाटचाल करत असल्याचं शहा यांनी या निवडीनंतर सांगितलं. अमित शहा यांनी 2019 ते 2024 या कालावधीत समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं. राजभाषा विभाग एक सॉफ्टवेअर विकसित कर...

September 9, 2024 7:02 PM September 9, 2024 7:02 PM

views 9

राज्य विधानसभा निवडणुकीत १६० जागा लढवून १२५ जागा जिंकण्याचं भाजपाचं लक्ष्य

आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपानं १६० जागा लढवाव्या. त्यातल्या किमान १२५ जागा जिंकण्याचं उद्दिष्ट पक्षानं ठेवावं यावर भाजपाच्या कालच्या बैठकीत चर्चा झाल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल रात्री मुंबईत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर नेते या बैठकीला उपस्थित होते. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी जागावाटपाची अनौपचारिक चर्चा सुरू झाली आहे. पण त्यांना ७० हून अधि...

September 9, 2024 3:33 PM September 9, 2024 3:33 PM

views 21

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी घेतले गणरायाचे दर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशीष शेलार, भाजपा नेते रावसाहेब दानवे आणि इतर यावेळी उपस्थित होते. त्यानंतर शहा यांनी मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. तसंच वांद्रे पश्चिम इथल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचं दर्शन घेऊन पूजा केली. गृहमंत्री...

September 8, 2024 8:12 PM September 8, 2024 8:12 PM

views 11

अमित शाह यांच्या हस्ते ‘मुंबई समाचार’ वृत्तपत्राच्या द्विशताब्दीनिमित्त तयार केलेल्या लघुपटाचं अनावरण

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आज आगमन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर अमित शहा यांनी मुंबई समाचार या वृत्तपत्राच्या द्विशताब्दीनिमित्त तयार केलेल्या लघुपटाचं अनावरण केलं. १८२२ मधे मुंबईत सुरु झालेलं हे गुजराती वर्तमानपत्र आशिया खंडातल्या सर्वात जुन्या वर्तमानपत्रांपैकी एक आहे.  गृहमंत्री शाह उद्या दिवसभर मुंबईतल्या विविध भागातल्या गणेश मंडळांना भेट देणार आहेत.

September 8, 2024 1:22 PM September 8, 2024 1:22 PM

views 10

केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीच जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करू शकतील – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीच जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करू शकतील, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. जम्मूमध्ये काल भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर योग्यवेळी जम्मू-काश्मीला राज्याचा दर्जा बहाल केला जाईल असं आपण स्वतः संसदेत ऑगस्ट 2019 मध्ये आश्वासन दिलं होतं, असंही ते म्हणाले. कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच विधानसभेची निवडणूक होत असल्यानं ती ऐतिहासिक असल्याचंही अमित शाह म्हणाले.

August 27, 2024 1:51 PM August 27, 2024 1:51 PM

views 8

पोलीस संशोधन आणि विकास विभागाच्या ५४ व्या स्थापना दिनाच्या सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या सहभागी होणार

B P R D अर्थात पोलीस संशोधन आणि विकास विभागाच्या ५४ व्या  स्थापना दिनाच्या सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या नवी दिल्लीत सहभागी होतील. यानिमित्ताने आयोजित डॉ. आनंद स्वरुप गुप्ता स्मृती व्याख्यानमालेत ‘नवीन फौजदारी कायदेः नागरीककेंद्रित सुधारणा’ या विषयावर शाह व्याख्यान देतील. यावेळी ते विशिष्ट सेवा आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदकप्राप्त झालेल्यांचा गौरव करतील. तसंच नवीन फौजदारी कायदे या विषयावरल्या इंडियन पोलीस जर्नल या विशेषांकाचं प्रकाशन करतील.

August 26, 2024 1:02 PM August 26, 2024 1:02 PM

views 9

‘देश अंमली पदार्थमुक्त करण्याचा प्रधानमंत्र्यांचा संकल्प आता देशवासियांचा संकल्प’

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल छत्तीसगडमधील नवा रायपूर इथं अंमली पदार्थ नियंत्रण कार्यालयाच्या प्रादेशिक कार्यालयाचं दूरदृश्य प्राणलीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आलं. यावेळी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली छत्तीसगडमधल्या अंमली पदार्थांच्या परिस्थितीबाबत आढावा बैठकही झाली. भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात अर्थात २०४७ पर्यंत देश अंमली पदार्थमुक्त करण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प आता प्रत्येक देशवासीयाचा संकल्प बनत आहे, असं शहा यावेळी म्ह...