December 25, 2024 6:44 PM December 25, 2024 6:44 PM

views 5

केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन सहकारी संस्थांचं लोकार्पण

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्लीमध्ये पुसा इथं नव्यानं स्थापन झालेल्या दहा हजारापेक्षा जास्त बहुउद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी संस्था, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचं लोकार्पण केलं. यावेळी त्यांनी या संस्थांना नोंदणी प्रमाणपत्रं, रुपे किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो एटीएमचं वितरणही केलं. पंचायतींमध्ये कर्जाची सेवा सहज उपलब्ध करून देण्यासाठी आणि आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठी ही आर्थिक साधनं तयार करण्यात आली आहेत. देशाच्या ग्रामीण भागातल्या जनतेला विविध य...

December 21, 2024 9:08 AM December 21, 2024 9:08 AM

views 12

त्रिपुरामध्ये आगरतळा इथं आज ईशान्य राज्य परिषदेची 72 वी बैठक होणार

त्रिपुरामध्ये आगरतळा इथं आज ईशान्य राज्य परिषदेची 72 वी बैठक होणार आहे. केंद्रिय गृहमंत्री अमित शहा या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. ईशान्य प्रदेश विकास मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, राज्यमंत्री डॉक्टर सुकांता मुजुमदार हे देखील या बैठकीत सहभागी होणार आहेत. तसंच ईशान्येकडील सर्व राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्रीसुद्धा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमुळे ईशान्य प्रदेशाच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास केंद्रिय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल व्यक्त केला. 

November 12, 2024 8:13 PM November 12, 2024 8:13 PM

views 9

मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी कुणाचं आरक्षण कमी करणार ? – गृहमंत्री अमित शाह

भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुंबईत घाटकोपरमधे प्रचारसभा घेतली. मुस्लिम धार्मिक नेत्यांनी १० टक्के आरक्षण मागितलं आहे. मात्र हे आरक्षण देण्यासाठी कुणाचं आरक्षण कमी करणार असा प्रश्न त्यांनी विरोधी पक्षांना केला.    राम मंदिर बांधण्याचं आश्वासन आम्ही दिलं होतं, ते पूर्ण केलं. काशी विश्वनाथ कॉरिडॉरही तयार केला. वक्फमधे सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आणि याबाबतच्या कायद्यात दुरुस्ती केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. कोणतीही जमीन अशीच वक्फची होऊ शकत नाही, असं ते म्...

November 8, 2024 8:33 PM November 8, 2024 8:33 PM

views 5

मविआनं बंद केलेल्या योजना पुन्हा सुरु केल्या जातील – गृहमंत्री अमित शाह

केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते अमित शाह यांच्या दोन प्रचारसभा आज राज्यात झाल्या. केंद्रात पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार २००४ ते २०१४ या कालावधीत दहा वर्षे सत्तेत असतानाच्या काळात महाराष्ट्राला केवळ १ लाख ९१ हजार कोटी रूपये निधी मिळाला तर, मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात १० लाख १५ हजार ८९० कोटी रूपये निधी मिळाला असल्याचं त्यांनी सातारा इथल्या सभेत सांगितलं.    भारताला सर्व क्षेत्रात सर्वोत्तम बनवणं हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं लक्ष्य असून हे एनडीए सरकारच करु शकतं असं शाह यांनी सा...

November 8, 2024 1:26 PM November 8, 2024 1:26 PM

views 4

महाविकास आघाडी सरकारने बंद केलेल्या योजना पुन्हा सुरु करण्याचं अमित शहा यांचं आश्वासन

भारताला सर्व क्षेत्रात सर्वोत्तम बनवणं हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं लक्ष्य असून हे एनडीच सरकारचं करु शकतं असं केंद्रिय मंत्री अमित शहा यांनी सांगली इथं प्रचारसभेत म्हटलं आहे.   त्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं. महाविकास आघाडीनं बंद केलेल्या योजना पुन्हा सुरु केल्या जातील, असं सांगून त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्या स्मृतींना त्यांनी वंदन केलं.

November 3, 2024 7:58 PM November 3, 2024 7:58 PM

views 10

झारखंडमध्ये सत्तेत आल्यावर आदिवासी वगळता इतरांसाठी समान नागरी कायदा लागू करण्याचं भाजपाचं संकल्पपत्रात आश्वासन

झारखंडमध्ये सत्तेत आल्यावर समान नागरी कायदा लागू करू, मात्र आदिवासींना त्याच्या कक्षेतून बाहेर ठेवू असं आश्वासन भाजपानं दिलं आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठीचं पक्षाचं संकल्प पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज रांचीमध्ये प्रसिद्ध केलं. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिलं. संथाल परगणा भागातली बांग्लादेशी घुसखोरी रोखण्यासाठी कायदे बनवले जातील या लोकांनी आदिवासी महिलांसोबत विवाह करुन त्यांची जमीन हडपल्याचा दावा त्यांनी केला. कायदा झाल्यावर आदिवासींना त्यांच्या जमिनी पुन्हा दिल्या जातील. गोगो द...

November 1, 2024 10:34 AM November 1, 2024 10:34 AM

views 8

अमित शहा यांच्या हस्ते गुजरात मधील ऊर्जा’ निर्मितीच्या सर्वात मोठ्या केंद्राचं उद्घाटन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज गुजरात मधील अहमदाबाद इथल्या पिराना मधील 'कचऱ्या पासून ऊर्जा' निर्मितीच्या सर्वात मोठ्या केंद्राचं उद्घाटन होणार आहे.   गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. 375 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेलं हे केंद्र, सार्वजनिक-खाजगी-भागीदारीतून उभारण्यात येत आहे. एक हजार मेट्रिक टन घन कचऱ्यापासून 15 मेगा वाट ऊर्जा निर्मितीची या केंद्राची क्षमता आहे.

October 22, 2024 6:32 PM October 22, 2024 6:32 PM

views 5

न्यायालयाचा हस्तक्षेप कमी व्हावा याकरता कायद्याचा मसुदा स्पष्ट पाहिजे – गृहमंत्री अमित शाह

न्यायालयाचा हस्तक्षेप कमीत कमी व्हावा याकरता कायद्याचा मसुदा स्पष्ट असला पाहिजे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. गुजरातमधे गांधीनगर इथं गुजरात विधानसभेच्या आमदारांसाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. कायदा सुस्पष्ट आणि त्रुटीविरहीत असला की त्याची अंमलबजावणी करणंही सोपं होईल, आणि लोकशाहीच्या कायापालटाला हातभार लागेल  असं ते म्हणाले. आमदारांनी कायद्याचा मसुदा तयार करण्याचं प्रशिक्षण घ्यावं असं आवाहन शहा यांनी केलं. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि विधानसभा अध्यक्ष शंकर चौधरी...

October 21, 2024 8:27 PM October 21, 2024 8:27 PM

views 5

‘सायबर गुन्हेगारी, दहशतवाद यासारखी संकटं देशाच्या जवानांच्या दृढ निश्चयाचा सामना करू शकत नाहीत’

अमली पदार्थांचा व्यापार, सायबर गुन्हेगारी, दहशतवाद यासारखी संकटं देशाच्या जवानांच्या दृढ निश्चयाचा सामना करू शकत नाहीत असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत राष्ट्रीय पोलीस स्मारक इथं पोलीस स्मृती दिनानिमित्त हुत्मात्यांना शहा यांनी आदरांजली वाहिली, त्यावेळी ते बोलत होते.  सुरक्षा दलांची कार्यक्षमता आणि समर्पण यामुळे गेल्या दशकभरात देशात शांतता प्रस्थापित करण्यात यश आलं आहे, असंही शहा म्हणाले.    नुकतेच लागू करण्यात आलेल्या तीन नव्या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी संप...

October 21, 2024 1:41 PM October 21, 2024 1:41 PM

views 42

पोलीस स्मृतीदिनानिमित्त देशाचं शहीद पोलिसांना अभिवादन

आज पोलीस स्मृतिदिन. २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख इथे चिनी सैन्याचा हल्ला परतवताना दहा पोलीस कॉन्स्टेबल शहीद झाले होते. त्यांच्यासह देशभरातल्या विविध मोहिमांमध्ये आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या पोलिसांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आजचा दिवस पाळला जातो. या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्ली इथल्या राष्ट्रीय पोलीस स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं.   महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षभरात संपूर्ण देशभरात श...