March 27, 2025 2:51 PM March 27, 2025 2:51 PM

views 8

गृहमंत्री अमित शहा यांच्याविरुद्धचा हक्कभंग प्रस्ताव फेटाळला

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरुद्धचा हक्कभंग प्रस्ताव राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांनी आज फेटाळून लावला. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरुद्ध अपमानजनक टिप्पणी केल्याप्रकरणी काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी या प्रस्तावाची नोटीस दिली होती.   २५ मार्च  रोजी राज्यसभेत आपत्ती व्यवस्थापन विधेयकावर बोलताना शहा यांनी ही टिप्पणी केली  होती. या विधानात आपल्याला मर्यादांचं उल्लंघन आढळलं नाही असं धनखड यांनी सांगितलं. अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सदस्यांच्या वर्तनासाठी ...

March 22, 2025 9:41 AM March 22, 2025 9:41 AM

views 13

गेल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात राष्ट्रीय सुरक्षितता बळकट झाल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन

केंद्र सरकारने दहशतवादाचा बिमोड करण्याचे धोरण अवलंबले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात जम्मू काश्मिरमधील दहशतवादामुळे होणाऱ्या मृत्युंमध्ये 70 टक्के घट झाली असून दहशतवादाच्या घटनांही कमी झाल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी काल राज्यसभेत स्पष्ट केलं. गृहमंत्रालयाच्या कामकाजाशी निगडीत चर्चेला ते उत्तर देत होते. गेल्या दहा वर्षांत सरकारने जम्मू-काश्मिर मध्ये दहशतवाद, नक्षलवाद आणि पुर्वोत्तर राज्यांमधील घुसखोरी या तीन मोठ्या आव्हानांचा सामना केला आहे.   केंद्र सरकारने कलम 370 दूर करुन...

March 21, 2025 8:16 PM March 21, 2025 8:16 PM

views 19

एनडीए सरकारच्या काळात जम्मू-काश्मीरमधे दहशतवादी घटनांमध्येही मोठी घट

राज्यसभेत आज गृह मंत्रालयाच्या कामकाजावर चर्चा झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं केंद्र सरकार दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुतेचं धोरण बाळगणारं आहे, त्यामुळेच एनडीए सरकारच्या काळात जम्मू आणि काश्मीरमधे दहशतवादामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ७० टक्क्यानं घट झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या चर्चेच्या वेळी सांगितलं.   या क्षेत्रातल्या दहशतवादी घटनांमध्येही मोठी घट झाल्याचं ते म्हणाले. यावेळी शहा यांनी देशाच्या सीमा आणि अंतर्गत सुरक्षा बळकट करण्यासाठी बलिदान देणाऱ्या राज्य...

March 7, 2025 1:29 PM March 7, 2025 1:29 PM

views 26

२०२७ पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार – अमित शाह

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०२७ पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, याचा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. केंद्रीय औद्यागिक सुरक्षा दल-CISF च्या ५६ व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते जवानांशी बोलत होते. देशातील महत्त्वाच्या संस्थांच्या सुरक्षेत तैनात असलेलं CISF हा राष्ट्राच्या विकासाचा महत्त्वाचा भाग असल्याचंही शाह म्हणाले. CISF च्या महिला तुकडीचंही शाह यांनी कौतुक केलं.

February 15, 2025 10:14 AM February 15, 2025 10:14 AM

views 10

फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांकडून दिल्लीत आढावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल दिल्लीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत राज्यातल्या तीन नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक घेतली. या नव्या फौजदारी कायद्यांच्या अनुषंगाने, महाराष्ट्रातलं पोलिस दल, तुरुंग, न्यायालयं, खटले आणि न्यायवैद्यकशास्त्राशी निगडीत नव्या विविध तरतुदींच्या अंमलबजावणी आणि सद्यस्थितीचा आढावा घेतला.   राज्यातल्या सर्व आयुक्तांलयांमध्ये शक्य तितक्या लवकर नवे फौजदारी कायदे लागू करण्याची सूचना केली. या बैठकीला राज्याच्या पोलिस महा...

January 23, 2025 3:26 PM January 23, 2025 3:26 PM

views 8

अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईत होणाऱ्या एका कार्यक्रमात राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन शाह यांच्या हस्ते होणार आहे.   आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष २०२५ निमित्तानं वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आणि देशभर नव्यानं स्थापन झालेल्या १० हजार नवीन बहुउद्देशीय सहकारी संस्थांसाठीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात अमित शाह यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

January 11, 2025 8:56 PM January 11, 2025 8:56 PM

views 12

गेल्या वर्षभरात १६ हजार ९१४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

गेल्या वर्षभरात १६ हजार ९१४ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात पोलीस आणि अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाला यश मिळालं आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची ही सर्वाधिक आकडेवारी आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. ते आज दिल्लीत अंमली पदार्थ तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरच्या परिषदेत बोलत होते. अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा मोहिमेचं तसंच मानस - दोन या हेल्पलाईन सेवेच्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या विस्ताराचं उद्घाटनही अमित शहा यांच्या हस्ते झालं. ही मोहीम येत्य...

January 11, 2025 3:35 PM January 11, 2025 3:35 PM

views 11

केंद्रीय गृहमंत्री उद्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून ते शनिशिंगणापूर आणि शिर्डीला भेट देणार आहेत. शिर्डीमध्ये होणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या राज्य अधिवेशनाला ते उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाला मंगलप्रभात लोढा, संजय सावकारे, चंद्रकांत पाटील, यांच्यासह भाजपाचे इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत.

January 7, 2025 1:45 PM January 7, 2025 1:45 PM

views 5

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते सीबीआय च्या ‘भारत पोल’ या पोर्टलचं उद्घाटन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली इथं सीबीआय नं विकसित केलेल्या ‘भारत पोल’ या पोर्टलचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी सीबीआय च्या ३५ अधिकाऱ्यांना असामान्य सेवेबद्दल पोलीस पदकं प्रदान केली. विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि तपासातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी केंद्रीय गृहमंत्री पदकाचा यात समावेश आहे. ‘भारतपोल’ पोर्टल आंतरराष्ट्रीय तपासाला नव्या युगात घेऊन जाणार असल्याचं अमित शाह यावेळी म्हणाले. इंटरपोलकडून आंतरराष्ट्रीय सहाय्य मिळवण्यासाठी विनंती प्रक्रिया सुव्यवस्थित करणं, हे ‘भारत...

December 27, 2024 3:15 PM December 27, 2024 3:15 PM

views 10

बियाण्यांच्या उत्पादनावर अधिक लक्ष केंद्रीत केलं पाहिजे-अमित शहा

भारतीय बीज सहकारी संस्थेनं कमी पाणी आणि कमी कीटकनाशकांच कमी प्रमाण आवश्यक असलेल्या बियाण्यांच्या उत्पादनावर अधिक लक्ष केंद्रीत केलं पाहिजे असं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. भारतीय बीज सहकारी संस्थेच्या काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. लहान शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त उत्पादन मिळावं यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं शहा म्हणाले.   भारतीय बीज सहकारी संस्थेनं भारतातल्या पारंपारिक बियांचं संकलन आणि संवर्धन करण्याच्या दिशेने वेगाने काम करत असल्याचं त्यांनी सांगितल...