June 11, 2025 3:14 PM June 11, 2025 3:14 PM

views 15

अत्याधुनिक पायाभूत सुविधांमुळे देशाची एकात्मतेवर भर – गृहमंत्री अमित शाह

गेल्या अकरा वर्षांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये केंद्र सरकारने केलेल्या क्रांतीमुळे भारताचं नवनिर्माण झालं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. नवनवीन अत्याधुनिक पायाभूत सुविधांमुळे देशाची एकात्मता आणि मजबूती यात भर पडल्याचं शहा यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या सुविधांमुळे व्यापार आणि आर्थिक व्यवहार पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक वेगवान झाले आहेत असं शाह यांनी नमूद केलं आहे.

June 11, 2025 10:57 AM June 11, 2025 10:57 AM

views 15

पुर व्यवस्थापन तंत्रआधारित यंत्रणेच्या माध्यमातून करावं- गृहमंत्री अमित शहा

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर देशातील पूर व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इथं उच्चस्तरीय बैठक झाली. नदीच्या आसपास पुराचा धोका कमी करण्यासाठी राबवण्यात आलेल्या उपाययोजनांचा तसंच गेल्या वर्षी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांवर कोणती पावले उचलली आहेत याचा आढावा त्यांनी घेतला.   नवीन तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा, पूर व्यवस्थापनासाठी परस्पर सहकार्यानं कसं काम करेल यावर सविस्तर चर्चा झाल्याचं गृह मंत्रालयाने दिलेल्या ...

June 6, 2025 8:35 PM June 6, 2025 8:35 PM

views 11

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते नवी दिल्लीत भारतीय भाषा विभागाचं उद्घाटन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीत भारतीय भाषा विभागाचं उद्घाटन केलं. विदेशी भाषांच्या प्रभावापासून प्रशासनाला मुक्त करण्याच्या दिशेनं हे एक पाऊल असल्याचं ते म्हणाले.  

April 26, 2025 1:26 PM April 26, 2025 1:26 PM

views 8

पाकिस्तानबरोबरचा सिंधु जल वाटप करार स्थगित करण्याचा निर्णय – केंद्रीय गृहमंत्री

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानबरोबरचा सिंधु जल वाटप करार स्थगित करण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली. शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस जयशंकर, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.   पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं सिंधू जलवाटप करार स्थगित करण्याचा घेतलेला निर्णय हा पूर्णपणे न्यायसंगत असून राष्ट्र...

April 26, 2025 9:53 AM April 26, 2025 9:53 AM

views 9

भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना तातडीनं परत पाठविण्याच्या गृहमंत्रालयाच्या सर्व राज्यांना सूचना

 भारतात आलेल्या, सध्या वास्तव्यास असलेल्या  पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून त्यांना तात्काळ परत पाठवण्यासाठी पावलं उचलण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांना दिल्या.    या संदर्भात त्यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. काल नवी दिल्ली इथून 191 पाकिस्तानी नागरिकांची मायदेशी रवानगी करण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी तयार झाली आहे. त्यांनी तात्काळ देश सोडावा यासाठी प्रयत्न केले जातील, दिरंगाई झाल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा महाराष्ट्राचे म...

April 25, 2025 3:17 PM April 25, 2025 3:17 PM

views 16

पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यासाठी पावलं उचलण्याच्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सूचना

पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून त्यांना तात्काळ परत पाठवण्यासाठी पावलं उचलण्याच्या सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्यांना केल्या आहेत.   केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन हा संदेश दिला. सिंधू जल कराराच्या संदर्भात अमित शहा संध्याकाळी बैठक घेणार आहेत. त्यात केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

April 10, 2025 3:18 PM April 10, 2025 3:18 PM

views 6

  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर

 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या आणि परवा म्हणजे ११ आणि १२ एप्रिलला महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. उद्या संध्याकाळी आठ वाजता त्यांचं पुण्यात आगमन होईल. परवा सकाळी रायगड जिल्ह्यात पाचाड इथं राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचं ते दर्शन घेतील.   त्यानंतर रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतील आणि रायगडावर आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील. त्याच दिवशी संध्याकाळी साडे पाच वाजता मुंबईत गुजराती साप्ताहिक पत्रिका चित्रलेखाच्या ७५व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला ते  उपस्थित ...

April 2, 2025 10:28 AM April 2, 2025 10:28 AM

views 16

देशाची नक्षलमुक्त होण्याच्या दिशेने पावलं

देश नक्षलमुक्त होण्याच्या दिशेने मोठी पावलं उचलत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हंटलं आहे. देशातील नक्षलवादी जिल्हयाची संख्या 12 वरुन 6 वर आणण्यात सरकारला यश आल्याचं त्यांनी नमूद केलं.   केंद्र सरकार,नक्षल चळवळी विरोधात कठोर पावलं उचलत असून, सशक्त, सुरक्षित आणि समृद्ध भारताची निर्मिती करत आहे. 31 मार्च 2026 पर्यन्त देशातून नक्षल चळवळ समूळ नष्ट होईल असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला आहे.

March 28, 2025 10:36 AM March 28, 2025 10:36 AM

views 11

स्थलांतर आणि परदेशी नागरिक विधेयक 2025 लोकसभेत मंजूर

स्थलांतर आणि परदेशी नागरिक विधेयक, 2025 काल लोकसभेत संमत करण्यात आलं. स्थलांतरविषयक कायद्यांचं आधुनिकीकरण करणं आणि पारपत्रं, प्रवासविषयक दस्तऐवज, व्हिसा आणि नोंदणी यासंदर्भात केंद्र सरकारला काही विशिष्ट अधिकार देणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. या विधेयकावर सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना देताना गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा बळकट करण्याच्या दृष्टीनं हे विधेयक अत्यंत महत्त्वाचं असल्याचं सांगितलं.   भारत हा भू-राजकीय नव्हे तर भू-सांस्कृतिक देश आहे. स्थलांतरितांचं स्वागत करून...

March 28, 2025 9:56 AM March 28, 2025 9:56 AM

views 13

देशात लवकरच सहकारी तत्त्वावर टॅक्सी उपक्रम

केंद्र सरकार ओला-उबर यासारख्या व्यावसायिक सेवांच्या धर्तीवर सहकार टॅक्सी हा सहकारी तत्त्वावर चालवला जाणारा उपक्रम सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काल केली. लोकसभेततील एका चर्चेत बोलताना शहा यांनी हा उपक्रम सहकार से समृद्धी या धोरणाशी सुसंगत असल्याचं सांगितलं.   या उपक्रमांतर्गत अत्यंत मोठ्या स्वरुपात सहकारी टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार असून त्याअंतर्गत दुचाकी, टॅक्सी, रिक्षा आणि चारचाकी गाड्यांची नोंदणी करता येऊ शकेल आणि त्याचा नफा थेट चालकाला मिळेल,...