July 5, 2025 8:14 PM July 5, 2025 8:14 PM
11
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते त्रिभुवन सहकारी विद्यापीठाचं भूमीपूजन
केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज गुजरात मध्ये त्रिभुवन सहकारी विद्यापीठ या देशातल्या पहिल्या सहकार विद्यापीठाची कोनशिला बसवण्यात आली. कोट्यवधी गरीब आणि ग्रामीण लोकांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करण्यासाठी आपलं मंत्रालय वचनबद्ध आहे, देशातल्या सहकार चळवळीत आता सुमारे ४० लाख कामगार जोडले गेले आहेत, असं त्यांनी सांगितलं. हे विद्यापीठ धोरण निर्मिती, डेटा विश्लेषण, सहकार क्षेत्रातले धोरणात्मक निर्णय आणि संशोधन यावर भर देईल, असं शाह म्हणाले.