June 16, 2024 2:41 PM June 16, 2024 2:41 PM

views 19

जम्मू – काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

जम्मू आणि काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. जम्मू -काश्मीरमध्ये अलिकडे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तिथल्या सुरक्षा स्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात येत आहे.   राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला या बैठकीला उपस्थित आहेत. गुप्तचर विभागाचे संचालक, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, नवनियुक्त लष्करप्रमुख उपें...