October 26, 2025 8:32 PM October 26, 2025 8:32 PM
80
केंद्रीय गृहमंत्री मुंबईत इंडिया मॅरिटाईम वीक परिषदेचं उद्घाटन करणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या मुंबईत इंडिया मॅरिटाईम वीक या पाच दिवसीय परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यावेळी उपस्थित असतील. याशिवाय, गृहमंत्री अमित शहा उद्या माझगांव गोदीत खोल समुद्रात मासेमारी करण्याच्या विशेष नौकांच्या चाव्या लाभार्थ्यांना सुपूर्द करणार आहेत.