November 10, 2024 2:03 PM November 10, 2024 2:03 PM
5
चेन्नई ग्रँड मास्टर्स बुद्धीबळ स्पर्धेत अमेरिकेच्या लेवॉन अरोनियन यानं आपलं अंतिम फेरीतलं स्थान केलं निश्चित
चेन्नई ग्रँड मास्टर्स बुद्धीबळ स्पर्धेत अमेरिकेच्या लेवॉन अरोनियन याने फ्रान्सच्या माक्झिम वेचिएर याचा पराभव करत अंतिम फेरीतलं स्थान पक्क केलं आहे. या विजयामुळे लेवॉनच्या खात्यात साडे तीन गुणांची भर पडली असून तो गुणतालिकेत ग्रँडमास्टर अर्जुन एरिगसी याच्या जवळ पोहोचला आहे. एरिगसीच्या खात्यात चार गुण आहेत. दुसरीकडे विदित गुजराती याचा अमिन टाबाटाबेई विरुद्धचा आणि एलेक्सी सराना याचा परहम मेगसूदलू याच्याविरुद्धचा सामना अनिर्णित राहिला. चॅलेंजर्स प्रकारात मुरली कार्तिकेयन याने अभिमन्यु पुराणिक याचा तर...