June 18, 2025 1:57 PM

views 49

भारत – अमेरिका व्यापार समझोता आणि भारत – पाकिस्तान दरम्यान मध्यस्थीसाठी अमेरिकेबरोबर कोणत्याही पातळीवर कधीही चर्चा झाली नव्हती, प्रधानमंत्र्यांचं स्पष्ट प्रतिपादन

भारत - अमेरिका व्यापार समझोता आणि भारत - पाकिस्तान दरम्यान मध्यस्थीसाठी अमेरिकेबरोबर कोणत्याही पातळीवर कधीही चर्चा झाली नव्हती असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना स्पष्ट सांगितलं आहे. परराष्ट्र विभागाचे सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितलं की प्रधानमंत्री मोदी यांची अमेरिकेच्या अध्यक्षांबरोबर जवळजवळ ३५ मिनिटं दूरध्वनीवरुन चर्चा झाली. त्यावेळी मोदी यांनी स्पष्ट केलं की भारत- पाकिस्तान दरम्यान पाकिस्तानच्या विनंतीवरुन थेट सेनादल पातळीवर चर्चा झाली होती. भारताने आज...

May 23, 2025 7:24 PM

views 13

अमेरिका-इराण अण्वस्त्र विषयक चर्चेची पाचवी फेरी सुरू

अमेरिका आणि इराण दरम्यान सुरु असलेल्या अण्वस्त्र विषयक चर्चेची पाचवी फेरी आज इटलीतल्या रोममध्ये सुरु झाली आहे.  यापूर्वी लादलेले आर्थिक निर्बंध शिथिल करण्याच्या मोबदल्यात इराणच्या अण्वस्त्र विषयक उपक्रमाला आळा घालण्याचा अमेरिकेचा उद्देश आहे. मात्र यापूर्वी झालेल्या चर्चेच्या चौथ्या फेरीदरम्यान इराणनं आपला युरेनियम संवर्धनाचा उपक्रम स्थगित करायला स्पष्ट नकार दिला होता. अमेरिकेनं  चर्चेच्या पाचव्या फेरीत पुन्हा हीच मागणी लावून धरली,  तर इराण ही मागणी पुन्हा एकदा फेटाळून लावेल, असं इराणचे परराष्ट्र...

April 24, 2025 8:08 PM

views 27

अमेरिकेसोबत आयात शुल्काबाबत चर्चा झाल्याचं वृत्त चीननं फेटाळलं

अमेरिकेसोबत आयात शुल्काबाबत चर्चा झाल्याचं वृत्त चीननं फेटाळून लावलं आहे. अमेरिकेसोबत कोणत्याही वाटाघाटी सुरू नाही तसंच कोणतेही करार केला जात नाहीत, असं चीनचे परराष्ट्र मंत्रायलायाचे प्रवक्त गुओ जियाकुन यांनी सांगितलं. आयुक्त शुल्काची लढाई अमेरिकेने सुरू केली आहे. चीन याबाबत चर्चा करायला तयार आहे, मात्र चर्चा करताना परस्पर आदर, समानता आणि दोघांचंही समान हीत असणं आवश्यक आहे, असं गुओ यांनी स्पष्ट केलं. चीन आणि अमेरिका यांच्यात चर्चा सुरू असल्याचं वृत्त अमेरिकन माध्यमांनी दिल्याच्या पार्श्वभूमीवर च...

April 14, 2025 8:07 PM

views 30

ब्लू ओरिजिन रॉकेटच्या माध्यमातून सहा महिलांचं पथक रवाना

अमेरिकेची गायिका केटी पेरी हिच्यासह सहा महिलांचं एक पथक आज ब्लू ओरिजिन या रॉकेटच्या माध्यमातून पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या पातळीपर्यंतचा प्रवास करणार आहे. केटी पेरीसह या पथकात टीव्ही प्रेझेंटर गेल किंग, चित्रपट निर्माते केरियन फ्लिन, माजी नासा एरोस्पेस अभियंता आयशा बोवे आणि लैंगिक हिंसाचाराच्या विरोधातल्या मोहीमेच्या संस्थापक अमांडा गुयेन यांचा समावेस आहे. हे उड्डाण पश्चिम टेक्सास इथून दुपारी दीड वाजता सुरू होईल. १९६३ मध्ये रशियन अंतराळवीर व्हॅलेंटिना तेरेशकोवा यांच्या ऐतिहासिक एकट्या उड्डाणा...

April 8, 2025 8:57 PM

views 17

अमेरिकेच्या धमक्यांना बळी पडणार नाही, चीनचं स्पष्टीकरण

अमेरिकेच्या धमक्यांना बळी पडणार नाही आणि व्यापार युद्ध संपवण्यासाठी अखेरपर्यंत कार्यरत राहू असं चीननं स्पष्ट केलं आहे. अमेरिकेनं चीनकडून होणाऱ्या आयातीवर अतिरीक्त कर लादण्याचा निर्णय घेतल्यावर चीननंही कर वाढवला. हे दर आजपासून कमी केले नाही तर आणखी ५० टक्के अतिरीक्त कर लादण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. अमेरिकेनं हे कर लादले तर चीनमधून अमेरिकेत जाणाऱ्या मालावर १०४ टक्के दराने कर आकारणी होईल. दरम्यान, घसरत्या शेअर बाजारांना दिलासा देण्यासाठी चीनमधल्या सरकारी क...

April 6, 2025 7:00 PM

views 16

पॉप गाण्याचा वापर करून ‘क्रूर’ हद्दपारीच्या व्हिडिओमुळे व्हाईट हाऊसवर टीका

अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या स्थलांतरितांना हद्दपारीसाठी तयार करत असतानाचा व्हिडीओ टाकल्यामुळे व्हाईट हाऊसवर टीका होत आहे. व्हाईट हाऊसने समाजमाध्यमावरच्या संदेशासोबत हा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. यात बेड्या घातलेल्या स्थलांतरितांना विमानात चढवत असतानाचं चित्रीकरण आहे. हा व्हिडीओ प्रसिद्ध झाल्यानंतर समाज माध्यमावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. हा प्रकार अतिशय क्रूर आणि अमानवी असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.   

February 17, 2025 8:39 PM

views 24

रशिया आणि अमेरिका यांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये उद्या चर्चा होणार

रशिया आणि अमेरिका यांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये उद्या चर्चा होणार आहे. रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावरोव्ह आणि पुतीन यांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार युरी उश्कोव्ह चर्चेत सहभागी होण्यासाठी उद्या सौदी अरेबियाच्या राजधानीत दाखल होतील, असं रशियन राष्ट्राध्यक्षाच्या कार्यालयाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितलं. अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबियो अमेरिकेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. रशिया-युक्रेन यांच्यातल्या संघर्षावर शांततापूर्ण मार्गानं तोडगा काढण्यासाठी ...

February 14, 2025 7:33 PM

views 18

लष्करी, वाणिज्य आणि तंत्रज्ञानातली भागिदारी बळकट करण्यावर भारत-अमेरिका यांच्यात सहमती

 यांच्यात लष्करी, वाणिज्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली भागिदारी आणखी बळकट करण्यासाठी कॉपॅक्ट या नव्या उपक्रमावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर प्रसिद्ध झालेल्या संयुक्त निवेदनात याविषयी अधिक माहिती दिली आहे.    संरक्षण भागीदारीसाठी नव्या दहा वर्षांच्या आराखड्यावर स्वाक्षरी केल्याची घोषणा भारत आणि अमेरिकेनं केली आहे. २०२५ ते २०३५ या दशकभरासाठी असणाऱ्या या आराखड्याचा हेतू दोन्ही देशातले संरक्षण संबंध दृढ करणं हा आह...

February 6, 2025 10:24 AM

views 18

अमेरिकेत अनधिकृत मार्गाने गेलेले 104 भारतीय मायदेशी परत

अमेरिकेत अनधिकृत मार्गाने गेलेल्या 104 भारतीयांना घेऊन अमेरिकन वायुदलाचं विमान काल अमृतसरमध्ये पोहोचलं. यामधील 30 जण पंजाबमधील असून इतर चंदिगड, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशातील रहिवासी आहेत. कोणतेही अधिकृत कागदपत्र नसलेल्या या प्रवाशांची चौकशी आणि ओळखपरेड सध्या सुरु आहे. अमृतसरमधील अधिकारी आणि विमानतळ प्रशासानाच्या सहकार्यानं हे काम सुरु आहे.  

January 30, 2025 8:53 PM

views 17

अमेरिकेत झालेल्या विमान दुर्घटनेत २८ जणांचा मृत्यू

अमेरिकेत, विमान आणि हेलिकॉप्टरची टक्कर होऊन झालेल्या दुर्घटनेत  किमान २८ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकन एअरलाइन्सचं हे विमान रोनाल्ड रीगन राष्ट्रीय विमानतळाकडे  येत असताना हवेतच त्याची हेलिकॉप्टरशी टक्कर झाली. या विमानात 60 प्रवासी आणि चार कर्मचारी, तर हेलिकॉप्टरमध्ये तीन सैनिक होते. शोधकार्य सुरु असून वॉशिंग्टन डीसीतल्या पोटोमॅक नदीतून किमान 30 मृतदेह हाती लागले आहेत. इतरांचा शोध घेण्यासाठी 300 कर्मचारी काम करत आहेत.