April 15, 2025 8:29 AM April 15, 2025 8:29 AM

views 21

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना १३४व्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती काल देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संसद भवन परिसरात प्रेरणा स्थळ इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरीवंश, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातल्या इतर सदस्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. डॉ. आंबेडकर यांच्या प्रेरणेमुळेच आज देश सामाजिक न्यायाचं स्वप्न सा...

April 14, 2025 1:38 PM April 14, 2025 1:38 PM

views 12

आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. मध्य प्रदेशात महू इथे विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव हे देखील या कार्यक्रमात सहभागी होणार असून यावेळी त्यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन आणि भीमरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येतील. भारतीय जनता पक्षातर्फे आजपासून २५ एप्रिलपर्यंत राज्यव्यापी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती आज मुंबईत मोठ्या उत्साहात ...

April 14, 2025 1:30 PM April 14, 2025 1:30 PM

views 9

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांचं अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, राज्यसभेतले सभागृह नेते जे. पी. नड्डा, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसद भवन संकुलातल्या आंबेडकर यांच्या पुतळ्याला आज अभिवादन केलं. तसंच, केंद्रीय मंत्री, संसद सदस्य, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता तसंच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही ड...

April 14, 2025 4:20 PM April 14, 2025 4:20 PM

views 19

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा

जीवनातल्या असंख्य अडचणींवर मात करून बाबासाहेबांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आणि आपल्या कर्तृत्वामुळे जगभरात आदराचं स्थान प्राप्त केलं, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.    डॉ. आंबेडकर यांच्या प्रेरणेमुळेच आज देश सामाजिक न्यायाचं स्वप्न साकार करू शकतोय. बाबासाहेबांची तत्वं, त्यांचे आदर्श, स्वावलंबी आणि विकसित भारताच्या निर्मितीला बळ आणि गती देतील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या संदेशात म्हणाले.   कोट्यवधी दलित आणि इतर मागास समुदायांसाठी बाबासाह...

April 13, 2025 6:25 PM April 13, 2025 6:25 PM

views 8

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींच्या शुभेच्छा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिवादन केलं असून, देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. बाबासाहेबांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून देदीप्यमान कामगिरी करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अलौकिक क्षमतांनी उजळून निघालेलं त्यांचं जीवन कार्य प्रेरणादायी आहे, असं राष्ट्रपतींनी शुभसंदेशात म्हटलं आहे. 

April 13, 2025 1:22 PM April 13, 2025 1:22 PM

views 23

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त देशभरात विशेष पदयात्रांचं आयोजन

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीच्या एक दिवस आधी देशभरात विविध ठिकाणी पदयात्रा काढली जात आहे.     विकसित भारताच्या उभारणीसाठी बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, न्याय आणि बंधुत्वाच्या दृष्टिकोनातून प्रेरणा घेण्याचं आवाहन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज युवकांना केलं आहे. बिहारमध्ये पटना इथं गांधी मैदानापासून सुरु होणाऱ्या पदयात्रेला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी आंबेडकर जयंतीनिमित्त दिल्ली सरकारनं आज दिल्लीत वॉकेथॉनचं आयोजन केलं आहे....