January 8, 2026 6:57 PM January 8, 2026 6:57 PM
6
अंबरनाथनगरपरिषदेमधे भाजपात गेलेल्या नगरसेवकांविरुद्ध काँग्रेस कायदेशीर पावलं उचलणार
भाजपामधे प्रवेश केलेल्या अंबरनाथमधल्या काँग्रेसच्या बारा नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी काँग्रेस कायदेशीर पावलं उचलणार असल्याचं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितलं. काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांनी स्वतंत्र गट स्थापन करणं किंवा दुसऱ्या पक्षात प्रवेश करणं हे असंवैधानिक आहे, त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल, असं सावंत म्हणाले. अंबरनाथमधल्या काँग्रेसच्या निलंबित नगरसेवकांना पक्षप्रवेश दिल्यामुळे भाजपाचा दुतोंडी चेहरा उघड झाल्याची टीका काँग्रेस प्र...