September 7, 2024 1:22 PM September 7, 2024 1:22 PM
4
कोल्हापूर इथल्या श्री अंबाबाई देवीच्या चरणी दोन आठवड्यात तब्बल ८० लाखांचे दागिने अर्पण
कोल्हापूर इथल्या श्री अंबाबाई देवीच्या चरणी भाविकांनी गेल्या दोन आठवड्यात तब्बल ८० लाखांचे दागिने अर्पण केले आहेत. एका भाविकाने ५० लाख रुपयांचा सोन्याचा सिंह अर्पण केला आहे तर गोव्याच्या प्रतापसिंह राणे यांच्या कुटुंबियांनी तीस लाख रुपयांचे सोन्याचे तोडे आणि कोल्हापुरी साज अर्पण केला.