July 14, 2024 3:21 PM

views 15

Amarnath Yatra 2024: चार हजार ८८९ यात्रेकरुंचा जत्था जम्मूच्या भगवती नगर शिबीरातून रवाना

अमरनाथ यात्रेसाठी चार हजार ८८९ यात्रेकरुंचा जत्था आज जम्मू इथल्या भगवती नगर शिबीरातून रवाना झाला.   सुमारे १८७ वाहनांमधून यात्रेकरुंनी आज सकाळी आपल्या प्रवासाला सुरुवात केली. यामध्ये ३ हजार ६७२ पुरुष, एक हजार ८६ महिला, २१ बालकं, ८८ साधू आणि २२ साध्वी यांचा समावेश आहे.   यापैकी १ हजार ८९६ यात्रेकरू, पहाटे बालताल बेस कॅम्पसाठी रवाना झाले तर २ हजार ९९३ यात्रेकरू पहलगाम बेस कॅम्पसाठी रवाना झाले. तिथून ते पवित्र गुहेच्या दिशेनं पुढे मार्गक्रमण करतील.

July 5, 2024 11:30 AM

views 23

अमरनाथ यात्रेसाठी भगवतीनगर तळावरील शिबिरामधून 7,919 भाविक 259 समूहात रवाना

अमरनाथ यात्रेसाठी काल जम्मू इथल्या भगवतीनगर तळावरील शिबिरामधून 7 हजार 919 भाविक 259 समूहात रवाना झाले. यात्रेकरूंची ही 7 वी तुकडी असून, त्यात 5 हजार 241 पुरुष, एक हजार 435 महिला, 214 साधू आणि 13 साध्वी तसच 16 लहान मुलांचा समावेश आहे. यामध्ये बालतल आधार शिबिरासाठी 2 हजार 542 तर पहलगाम शिबिरासाठी 4 हजार 377 भाविक रवाना झाले असून, तिथून अमरनाथ यात्रेचा त्यांचा पुढील प्रवास सुरू होणार आहे.