June 17, 2024 2:25 PM June 17, 2024 2:25 PM

views 29

जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही

जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचा संपूर्ण बीमोड करण्यासाठी दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाईसाठी सरकार कटिबद्ध आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. जम्मू आणि काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. आगामी अमरनाथ यात्रेच्या तयारीचा आढावाही त्यांनी घेतला.   जम्मू-काश्मीरमधला दहशतवादाविरुद्धचा लढा निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. दहशतवाद आता नियंत्रणात असून संघटित हिंसक दहशती कृत्यांऐवजी छुप्या संघर्षाचं रूप त्याला प...