August 6, 2024 11:34 AM

views 10

अमरनाथ यात्रेसाठी आणखी एक तुकडी रवाना

अमरनाथ यात्रेसाठी १,८७३ यात्रेकरूंची आणखी एक तुकडी जम्मूतल्या भगवती नगर यात्री निवास इथल्या तळ शिबिरातून काश्मीर खोऱ्याच्या दिशेनं रवाना झाली. ६९ वाहनांच्या या ताफ्यात पंधराशे ७९ पुरुष, २०२ महिला, ६५ साधू आणि २७ साध्वीचा समावेश आहे.

August 1, 2024 2:44 PM

views 7

अमरनाथ यात्रेसाठी १  हजार २९५ यात्रेकरूंची आणखी एक तुकडी काश्मीर खोऱ्याकडे रवाना

अमरनाथ यात्रेसाठी जम्मू मधल्या  भगवती नगर यात्री निवास बेस कॅम्पमधून १  हजार २९५ यात्रेकरूंची आणखी एक तुकडी ४८ वाहनांच्या ताफ्यासह, आज पहाटे काश्मीर खोऱ्याकडे रवाना झाली. यापैकी ३४९ यात्रेकरू बालताल बेस कॅम्प कडे, तर ९४६ यात्रेकरू पहेलगाम बेसकॅम्प कडे रवाना झाले.  तिथून पुढे ते अमरनाथ गुंफेकडे मार्गस्थ होतील.

July 30, 2024 10:08 AM

views 16

अमरनाथ यात्रेसाठी आणखी एक तुकडी जम्मू-काश्मीरमधल्या भगवतीनगर यात्री निवासातून रवाना

अमरनाथ यात्रेसाठी 1477 यात्रेकरूंची आणखी एक तुकडी आज पहाटे जम्मू-काश्मीरमधल्या भगवतीनगर यात्री निवासातून रवाना झाली. आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास 52 वाहनांमधून रवाना झालेल्या तुकडीत 1142 पुरुष, 254 महिला, तीन मुलं, 66 साधू आणि 12 साध्वींचा समावेश आहे.

July 27, 2024 3:02 PM

views 11

जम्मू-काश्मीरमधल्या बेसकॅम्पमधून आज १ हजार ७७१ यात्रेकरू अमरनाथ गुहेकडे रवाना

जम्मू-काश्मीरमधल्या भगवती नगर यात्री निवास इथल्या बेसकॅम्पमधून आज एक हजार ७७१ यात्रेकरू अमरनाथ गुहेकडे रवाना झाले. यात्रेकरूंना घेऊन जाणारी ६३ वाहने पहाटे पवित्र गुफेच्या दिशेने रवाना झाली. यातले ७७२ यात्रेकरू बाल्ताल मार्गाने तर ९९९ यात्रेकरू पहलगाम मार्गाने पुढचा प्रवास करतील.

July 19, 2024 3:35 PM

views 11

अमरनाथ यात्रेसाठी जम्मू मधल्या यात्रेकरूंची एक तुकडी काश्मीर खोऱ्याकडे रवाना

अमरनाथ यात्रेसाठी जम्मू मधल्या भगवती नगर यात्री निवास बेस कॅम्पमधून आज ४ हजार ८२१ यात्रेकरूंची आणखी एक तुकडी काश्मीर खोऱ्याकडे रवाना झाली. दीडशे वाहनांच्या ताफ्यासह यात्रेकरूंनी आज पहाटे बेस कॅम्प सोडला. यापैकी एक हजार ७३१ यात्रेकरू काश्मीर खोऱ्यातल्या बालताल बेस कॅम्पकडे, तर तीन हजार ९० यात्रेकरू पहेलगाव इथल्या बेस कॅम्प कडे रवाना झाले. तिथून पुढे ते अमरनाथ गुंफांकडे मार्गस्थ होतील.

July 14, 2024 3:21 PM

views 9

Amarnath Yatra 2024: चार हजार ८८९ यात्रेकरुंचा जत्था जम्मूच्या भगवती नगर शिबीरातून रवाना

अमरनाथ यात्रेसाठी चार हजार ८८९ यात्रेकरुंचा जत्था आज जम्मू इथल्या भगवती नगर शिबीरातून रवाना झाला.   सुमारे १८७ वाहनांमधून यात्रेकरुंनी आज सकाळी आपल्या प्रवासाला सुरुवात केली. यामध्ये ३ हजार ६७२ पुरुष, एक हजार ८६ महिला, २१ बालकं, ८८ साधू आणि २२ साध्वी यांचा समावेश आहे.   यापैकी १ हजार ८९६ यात्रेकरू, पहाटे बालताल बेस कॅम्पसाठी रवाना झाले तर २ हजार ९९३ यात्रेकरू पहलगाम बेस कॅम्पसाठी रवाना झाले. तिथून ते पवित्र गुहेच्या दिशेनं पुढे मार्गक्रमण करतील.

July 6, 2024 12:57 PM

views 15

मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित

जम्मू काश्मीरमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा आज तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केली आहे. बालताल आणि पेहलगाम या दोन्ही मार्गांवर सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ही यात्रा तात्पुरती स्थगित केल्याची माहिती एका अधिकाऱ्यानं दिली आहे.   २९ जूनला अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली असून ५२ दिवस सुरु राहणारी ही यात्रा १९ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. आतापर्यंत सुमारे १.५ लाख भाविक या यात्रेत सहभागी झाल्याची माहिती या अधिकाऱ्यानं दिली आहे.

June 29, 2024 8:13 PM

views 19

अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात

अमरनाथ यात्रेला आज सुरुवात झाली. अमरनाथ यात्रेसाठी जम्मूतल्या भगवती नगर बेस कॅम्प इथून आज पहाटे चार हजार २९ यात्रेकरूंची दुसरी तुकडी रवाना झाली. कडेकोट सुरक्षेसह यात्रेकरूंच्या २०० वाहनांचा ताफा काश्मीर खोऱ्याकडे रवाना झाला. तत्पूर्वी बेस कॅम्पचा परिसर बम बम भोले, हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. जम्मू बेस कॅम्प इथून आतापर्यंत आठ हजार ६३२ यात्रेकरू अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले आहेत. हेलिकॉप्टर सेवेद्वारे पोहोचलेल्या तीन हजारहून अधिक यात्रेकरूंनी आज  पवित्र गुफेत शिवलिंगाचे दर्शन घेत...

June 28, 2024 1:34 PM

views 15

अमरनाथ यात्रेला जम्मूहून प्रारंभ

सुप्रसिद्ध अमरनाथ यात्रेला आजपासून आरंभ झाला. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला जम्मूहून रवाना केलं. पहलगामहून उद्या यात्रा सुरु होईल. प्रशासनानं यात्रेकरूंसाठी ऑनलाईन नोंदणीसोबतच ऑफलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र आणि वैध ओळखपत्र सोबत असलेल्या यात्रेकरूंना २५० रुपये शुल्क भरून नोंदणी करता येईल.

June 24, 2024 2:59 PM

views 44

पहलगाम इथं अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक

  जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर अनंतनाग जिल्ह्यात पहलगाम इथं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक काल झाली. यात निवृत्त मेजर जनरल सुधीर बहल यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात सहभागी असलेल्या विविध संस्था आणि विभागाच्या तयारीचा आढावा घेतला.   एनडीआरएफ, एसडीआरएफ, जम्मू काश्मीर पोलीस, सीआरपीएफ, भारतीय हवामान विभाग, अग्निशमन दल या संस्थांनी सुधीर बहल यांच्यासमोर सादरीकरण केलं.दरम्यान, जम्मू काश्मीरच्या आरोग्य विभागाचे संचालक डॉ. मुश्ताक अहमद यांनी चंद...